Citroen C5 Aircross SUV: देशात एसयूव्ही कारची लोकप्रिय वाढत आहे. अशजतक अनेक वाहन उत्पादक कंपनी बाजारात आपली एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे. यातच आता वाहन उत्पादक कंपनी Citroen भारतात आपली मिड साईझ C5 Aircross लॉन्च करणार आहे. कंपनीने या कारमध्ये अनेक बदल केले आहेत. ग्राहकांना यात अनेक नवीन फीचर्स मिळणार आहे. चला तर कंपनीच्या या अपकमिंग कारबद्दल अधिक माहिती.


2022 Citroen C5 Aircross इंजिन 


मिळालेल्या माहितीनुसार, या नवीन कारमध्ये 177bhp पॉवर आउटपुटसह 2.0L डिझेल इंजिन दिले जाऊ शकते. Citroen C5 Aircross  ही कार फक्त एक 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्सच्या पर्यायाने सुसज्ज आहे. लवकरच कंपनी या कारला हायब्रीड व्हर्जनमध्येही लॉन्च करू शकते, असं सांगण्यात येत आहे.


2022 Citroen C5 Aircross फीचर्स 


कारला नवीन डिझाइन केलेली फ्री-स्टँडिंग 10-इंच फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिस्प्लेच्या खाली एसी व्हेंट्स, इलेक्ट्रिक सनरूफ, ventilated seats, वायरलेस चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, टू-पीस क्यूबड एअर-कॉन व्हेंट्स, 12.3-इंच डिजिटल ड्रायव्हर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, electrically cooled and heated seats सारखे फीचर्स यामध्ये मिळू शकतात. याशिवाय कारमध्ये हायवे ड्रायव्हर असिस्ट, लेन कीप असिस्ट, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ADAS सुरक्षा तंत्रज्ञान सारखे फीचर्स देखील दिले जाऊ शकतात.


नवीन C5 Aircross मध्ये बरेच बदल पाहायला मिळतील. या कारमध्ये ड्युअल एलईडी डीआरएल, सिंगल युनिट ग्रिल देण्यात आले आहेत. आतून बाहेरून स्टाइलिंग ट्वीक्स, स्प्लिट हेडलॅम्प सेटअप, नवीन डिझाइन अलॉय व्हील्स, नवीन फ्रंट डिझाइन उपलब्ध असतील. नवीन SUV ला एक मोठा आणि पुन्हा डिझाइन केलेला Citroen लोगो मिळेल. याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर Citroen च्या नवीन मिड-साईज SUV ची किंमत 32.24 लाख रुपये (एक्स-शोरूम) ते 34.23 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते. ही नवीन SUV भारतात आपल्या सेगमेंटमध्ये Hyundai Tucson, Volkswagen Tiguan आणि Jeep Compass सोबत स्पर्धा करेल.


इतर महत्वाच्या बातम्या: 


मुंबईकरांसाठी खुशखबर! आता इलेक्ट्रिक दुचाकीच्या चार्जिंगची चिंता विसरा, 500 ठिकाणी सुरु होणार बॅटरी स्वॅपिंग स्टेशन
Airbag Feature Cars in India : देशातील 10 टक्क्यांहून कमी कारमध्ये 6 एअरबॅगची सुविधा; जाणून घ्या कारण


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI