Tata Punch CNG VS Maruti Wagon R CNG : मारुती सुझुकीनंतर (Maruti Suzuki) आता टाटा मोटर्सही (Tata Motors) CNG कारवर अधिक लक्ष देत आहे. या कारणामुळे, कंपनीने अलीकडेच त्यांची हॅचबॅक कार Tiago NRG CNG व्हर्जनमध्ये लॉन्च केली आहे. तसेच टाटाच्या Tiago आणि Tigor ला CNG व्हर्जनमध्ये बाजारात आणले आहे. यानंतर Tiago NRG हे कंपनीचे तिसरे CNG वाहन आहे. या कारनंतर आता कंपनी आपली मिनी एसयूव्ही टाटा पंच (Tata Punch) देखील सीएनजी अवतारात आणणार आहे. ही कार भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकीच्या वॅगन आर सीएनजीला टक्कर देणार आहे.


मारुती सुझुकी वॅगन आर सीएनजी


मारुती सुझुकीची वॅगन आर सीएनजी देशात मोठ्या प्रमाणात विकली जाते. सीएनजी मोडवर ही कार 56 बीएचपी पॉवर आणि 82 एनएम टॉर्क जनरेट करते. याबरोबरच या कारमध्ये अनेक फीचर्सही उपलब्ध आहेत. या कारचा LXI प्रकार सीएनजी किटसह येतो. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.81 लाख रुपये आहे. 


ही कार 1.0L पेट्रोल आणि 1.2L पेट्रोल इंजिनच्या पर्यायासह येते. Wagon R च्या S-CNG व्हर्जनला 34.05 kmpl चा मायलेज मिळतो. या कारमधील वैशिष्ट्यांमध्ये स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, अँटी लॉक ब्रेकिंग (ABS), 7 इंच टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, पॉवर विंडो यांचा समावेश आहे.


टाटा पंच सीएनजी


टाटा पंचच्या CNG व्हर्जनमध्ये Tiago आणि Tigor सारख्या CNG किटसह समान 1.2 लिटर पेट्रोल इंजिन मिळेल. Tiago, Tigor आणि NRG मध्ये आढळणारे सध्याचे CNG इंजिन 6000 rpm वर 73 PS ची कमाल पॉवर आणि 3500 rpm वर 95 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन CNG मोडवर 26.49 kmpl चा मायलेज देते. टाटा मोटर्स 2023 ऑटो एक्सपोमध्ये या कारच्या CNG आणि EV व्हर्जन सादर करू शकतात. 


किंमत किती?


टाटा पंचच्या सध्याच्या व्हर्जनच्या किंमत 6 लाख ते 9.54 लाख रुपये आहे. त्याच वेळी, या कारच्या CNG व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 7.65 लाखांपासून सुरु होऊन ती 9.27 लाखांपर्यंत असू शकते. लॉन्च झाल्यानंतर ही कार नेक्सॉन सीएनजीशी स्पर्धा करेल.


महत्वाच्या बातम्या : 


Mclaren ने भारतात लॉन्च केली सर्वात महागडी कार, इतकीया किंमतीत खरेदी करता येईल अनेक फॉर्च्युनर


Car loan Information:

Calculate Car Loan EMI