Maruti Invicto vs Toyota Innova Hycross : मारुती सुझुकीने आपली इनव्हिक्टो एमपीव्ही लॉन्च केली आहे. जी टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 24.79 लाख ते 28.42 लाख रुपये आहे, जी Toyota च्या MPV पेक्षा थोडी स्वस्त आहे. मारुती सुझुकीने इनव्हिक्टो मध्ये काही नवीन वैशिष्ट्य जोडली आहेत. तर, आपण Maruti Invicto की Toyota Innova Hycross हे MPV एकमेकांपेक्षा कसे वेगळे आहेत ते जाणून घेऊयात. 


किंमत किती?


मारुती सुझुकी इनव्हिक्टोच्या Zeta+ एंट्री-लेव्हल ट्रिमची किंमत 24.79 लाख ते 24.84 लाख दरम्यान आहे. तर, स्पेस केलेल्या इनोव्हा हायक्रॉस VX ट्रिमपेक्षा 24 हजारांनी स्वस्त आहे. मारुती सुझुकी इनव्हिक्टोच्या कमी किंमतीचे कारण म्हणजे त्यात इनोव्हा हायक्रॉसच्या तुलनेत कमी वैशिष्ट्ये आहेत. Invicto Zeta+ मध्ये पार्किंग सेन्सर दिलेले नाहीत, तर समोर आणि मागील पार्किंग सेन्सर Highcross VX मध्ये उपलब्ध आहेत. Invicto मध्ये फक्त एक रिव्हर्स पार्किंग कॅमेरा मिळतो, तर Highcross ला 360-डिग्री कॅमेरा मिळतो. 


कारचं वैशिष्ट्य काय?


टोयोटा इनोव्हा हायक्रॉस बाजारात चार ट्रिममध्ये उपलब्ध आहे. तर, इन्व्हिक्टो फक्त दोन ट्रिममध्ये उपलब्ध आहे. दोन्ही MPV दोन प्रकारच्या सीटिंग लेआउटमध्ये उपलब्ध आहेत. दोघांना 2.0-लिटर पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरसह मजबूत-हायब्रीड पॉवरट्रेनचा पर्याय मिळतो, जे एकत्रितपणे 184 hp टॉर्क जनरेट करते.


Invicto मध्ये ऑटोमॅटिक अॅडजस्टेबल रिअर व्ह्यू मिरर आणि विंग मिरर सुद्धा देण्यात आला नाही. तसेच, मागील विंडो डिफॉगर आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम नाही. Invicto ला सहा एअरबॅग्ज मिळतात, तर इनोव्हा हायक्रॉसच्या फक्त VX (O), ZX आणि ZX (O) ट्रिमला सहा एअरबॅग मिळतात. 


कोणती कार सर्वात बेस्ट आहे?


जर आपण Invicto च्या Alpha + trim बद्दल बोललो तर त्याची किंमत 28.42 लाख रुपये आहे, तर Innova Highcross ZX ची किंमत 29.35 लाख रुपये आहे. Invicto Alpha + मध्ये फक्त सहा स्पीकर देण्यात आले आहेत, तर JBL-ट्यून्ड 9-स्पीकर सिस्टीम Highcross ZX मध्ये उपलब्ध आहे. तसेच, Invicto Alpha+ ला फक्त 17-इंच व्हिल्स आणि Highcross ZX ला 18-इंच व्हिल्स मिळतात. इनोव्हा हायक्रॉस ZX ला पॉवर्ड ऑटोमन सीट्स मिळतात, जी Invicto मध्ये उपलब्ध नाही. मारुतीच्या विंडशील्ड वायपर्समध्ये मिस्ट वायपर फंक्शनचा अभाव आहे. मारुती सुझुकी इनव्हिक्टोने ADAS नाही, जे हायक्रॉसच्या टॉप-स्पेक ZX (O) ट्रिममध्ये उपलब्ध आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


Maruti Suzuki Invicto Launched : मारुती सुझुकीची सर्वात महागडी MPV Invicto कार भारतात लॉन्च; किंमतीपासून ते फीचर्सपर्यंत 'ही' वैशिष्ट्य आहेत खास


Car loan Information:

Calculate Car Loan EMI