2023 Tata Harrier Booking: टाटा मोटर्सने आपल्या आगामी अपडेटेड मॉडेल 2023 हॅरियर एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू केली आहे. नवीन अपडेटेड हॅरियरच्या बाहेरील भागात कोणतेही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले नाहीत, परंतु केबिन आणि सेफ्टी फीचर्समध्ये सर्वात मोठे बदल करण्यात आले आहेत. नवीन हॅरियर आता ADAS प्रणालीने सुसज्ज असेल. यासोबतच यामध्ये इतरही अनेक बदल करण्यात आले आहेत. 


2023 Tata Harrier Booking: कसा असेल लूक?


टाटा मोटर्सने हॅरियरच्या सध्याच्या डिझाइनमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत, ज्यात 17-इंच डायमंड-कट अलॉय व्हील, झेनॉन एचआयडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, 3D एलईडी टेललॅम्प आणि क्रोम फिनिश आहे.


2023 Tata Harrier Booking:  इंटिरियर


हॅरियरच्या इंटिरिअरबद्दल बोलायचे झाले तर यात बरेच बदल करण्यात आले आहेत. सीटपासून डॅशबोर्डपर्यंत सर्व काही पूर्णपणे नवीन आहे. यात एक नवीन 7-इंच पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे, ज्यामध्ये अनेक नवीन इनबिल्ट फंक्शन्स देखील आहेत. याचे नवीन 12-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्मूथ आणि वेगवान आहे. तसेच JBL कडून 9-स्पीकर ऑडिओ सिस्टम आहे. कारला आता IRA-कनेक्टेड कार सूट मिळतो, ज्यामध्ये रिमोट कमांड, जिओफेन्सिंग, OTA अपडेट व्हेईकल सोल्यूशन यासह नवीन सेफ्टी फीचर्सचा समावेश आहे.


2023 Tata Harrier Booking: ADAS ने असेल सुसज्ज 


2023 Tata Harrier ला लेव्हल 2 ADAS सिस्टीम देखील मिळेल. ज्यामध्ये फ्रंट टक्कर अलर्ट, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेक, ट्रॅफिक साइन रेकग्निशन, हाय-बीम असिस्ट, लँड डिपार्चर वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन चेंज अलर्ट यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.


2023 Tata Harrier Booking: बुकिंग


कंपनीने 2023 टाटा हॅरियरसाठी बुकिंग सुरू केले आहे. ग्राहक ऑनलाइन किंवा डीलरशिपद्वारे बुक करू शकतात. यासाठी ग्राहकांना 30 हजार रुपये टोकन रक्कम जमा करावी लागणार आहे.


Maruti Suzuki Ciaz लॉन्च 


मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) त्याच्या Nexa डीलरशिपच्या माध्यमातून विकली जाणारी सेडान कार 2023 Ciaz एका नवीन ड्युअल-टोन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केली आहे. नवीन सियाझ (Maruti Suzuki Ciaz) कारमध्ये तीन ड्युअल-टोन कलर ऑप्शन्समध्ये लॉन्च करण्यात आलं आहे. यामध्ये ब्लॅक रुफच्या बरोबरच पर्ल मॅटेलिक ओपुलेंट रेड, ब्लॅक रुफ आणि पर्ल मॅटेलिक ग्रे तसेच ब्लॅक रुफ बरोबरच डिग्निटी ब्राऊन या कलरचा समावेश आहे. नवीन सियाझ लॉन्च करण्याच्या मुहूर्तावर मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी मार्केटिंग आणि सेल्स, शशांक श्रीवास्तव म्हणाले की, आम्हाला नवीन सियाझ कारचा लॉन्च करण्यात भरपूर आनंद झाला आहे. यामध्ये तीन नवीन ड्युल टोन कलर ऑप्शन आणि अधिक अपडेटेड फिचर्स देण्यात आले आहेत. याच्या टॉप-स्पेक अल्फा व्हेरियंटच्या ड्युअल-टोन मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 11.15 लाख रुपये आहे. तर, ऑटोमॅटिक व्हेरिएंटची एक्स-शोरुम किंमत 12.35 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI