BMW 3 Series Gran Limousine Facelift Review: BMW ने आपल्या 3 सीरीज ग्रॅन लिमोझिनमध्ये कॉस्मेटिक बदलांसह एक मोठे अपडेट दिले आहे. कंपनीने याचे इंटीरियर देखील बदलले आहे. विक्रीच्या बाबतीत ग्रॅन लिमोझिन हे या सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक आहे आणि या रिफ्रेश केलेल्या अपडेटमुळे याच्या विक्रीत आणखी वाढ होणार आहे. याचाच संपूर्ण रिव्ह्यू जाणून घेऊ... 


काही स्टाइलिंग ट्वीक्ससह बाह्य स्टाइलमध्ये केलेले बदल सहज दिसतात. ज्यामध्ये नव्याने डिझाइन केलेली किडनी ग्रिल आणि स्लिमर फुल एलईडी हेडलॅम्प प्रमुख आहेत. डीआरएल एल आकारात बनवले गेले आहेत. तर ग्रिलमध्ये डबल बार देण्यात आला आहे. ग्रॅन लिमोझिनचा व्हीलबेस 110 मिमीने वाढला आहे. म्हणजेच आता या 3 सिरीजमध्ये बरीच स्पेस देण्यात आली आहे. मागील स्टाइलिंगच्या अपडेट्समध्ये रीस्टाइल केलेले रियर बंपर आणि 18-इंचाचे डबल स्पोक अॅलॉय समाविष्ट आहेत. ज्यात एम स्पोर्ट स्टाइलिंग किटचा समावेश आहे आणि त्यास स्पोर्टी टच देते.


BMW 3 Series Gran Limousine Facelift Review: इंटिरियर


याच्या बाहेरील भागासोबतच आतील भागातही बरीच सुधारणा करण्यात आली आहे. याच्या नवीन डॅशबोर्ड लूक खूप आकर्षित करतो. यात नवीन 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे आणि दोन स्क्रीन एकमेकांशी जोडलेली एक मोठी 14.9-इंच टचस्क्रीन आहे. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि टचस्क्रीन हे दोन्ही चांगले ग्राफिक्स आणि इतर BMW कार प्रमाणे अधिक प्रीमियम लूकसह वापरण्यासाठी खूप चांगले आहेत. टचस्क्रीनवर काही कंट्रोल देखील दिले गेले आहेत. परंतु हवामान नियंत्रण प्रणाली अद्याप मॅन्युअल आहे. कंपनीने एअर व्हेंट्स कमी केले आहेत आणि अपडेटेड गियर सिलेक्टरसह स्टँडर्ड म्हणून तीन-झोन क्लायमेट कंट्रोल दिले आहे. आयड्राईव्ह कंट्रोलर, ड्राईव्ह एक्सपीरियंस बटणांसह अनेक फीचर्स आता टचस्क्रीनवर आहेत. 


BMW 3 Series Gran Limousine Facelift Review: इंजिन 


ही गाडी चालवायला खूप आरामदायी असून यात कोणतीही अडचण नाही. कारण याचे 330iL चार सिलेंडर स्मूथ इंजिन पेट्रोल इंजिन आणि 8-स्पीड ऑटोमॅटिकसह चांगले प्रदर्शन करतो. 258hp च्या पॉवरसह हे इंजिन या कारला स्पोर्टिनेस प्रदान करते. अधिक बॉडी रोलसह 3 सीरीज ग्रॅन लिमोझिन याच्या स्टँडर्ड मॉडेलपेक्षा चांगली दिसते. दरम्यान, नवीन इंटिरिअर्स आणि नवीन शार्प लुक्स 3 सीरीज ग्रॅन लिमोझिनला एक प्रभावी लक्झरी कार बनते. तसेच मॅन्युअलपेक्षा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन त्याच्या किमतीच्या रेंजसाठी खूप चांगली आहे.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI