Bajaj Pulsar 180 Discontinued: आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी बजाजची (Bajaj) पल्सर बाईक (Pulsar Bike) सिरीज खूप लोकप्रिय आहे. यातच पल्सर 180 बाईकसह (Pulsar 180) अनेक दुचाकींचा समावेश आहे. मात्र आता कंपनीने आपल्या पल्सर 180 बाईकची विक्री थांबवली असून याचे उत्पादन बंद केले आहे.
कंपनीने स्टोक पाठवणं केलं बंद (Bajaj Pulsar 180 Stock)
याशिवाय काही डीलरशिपने सांगितलं आहे की, कंपनीने या बाईकचा स्टॉक पाठवणे बंद केला आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीने याचे उत्पादनही बंद केले आहे. याची मागणीत आलेली घसरण आणि याच सिरींजमधील नवीन बाईक येत असल्याने याचे उत्पादन बंद करण्यात आले असावे, असं सांगण्यात येत आहे. कंपनीने ही बाईक फेब्रुवारी 2021 मध्ये भारतात लॉन्च केली होती. या बाईचा डिझाइन बऱ्या पैकी पल्सर 150 (pulsar 150) सारखेच आहेत. पल्सर 150 मध्येच काही बदल करून ही बाईक भारतात सादर करण्यात आली होती.
किंमत किती? (Bajaj Pulsar 180 Price)
बजाज पल्सर 180 ची एक्स-शोरूम किंमत 1.17 लाख रुपये होती. बजाज पल्सर 180 मध्ये 178.6 cc, एअर-कूल्ड, DTSi इंजिन देण्यात आले होते. जे 16.76 Bhp पॉवर आणि 14.52 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ही बाईक 15-लिटर इंधन टाकीसह येते आणि याचे वजन 151 किलो आहे. यात 17-इंचाचे अलॉय व्हील्स आहेत. यात ड्युअल स्प्रिंगसह 5-स्टेप प्रीलोड अॅडजस्टॅबिलिटीचा वापर करण्यात आला आहे.
दरम्यान, जून महिन्यात बजाज ऑटोने आपल्या बजाज पल्सर 250 चे (pulse 250) ब्लॅक एडिशन लॉन्च केले होते. कंपनीने ही बाईक 1.50 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) किंमतीत लॉन्च केली आहे. नवीन Pulsar 250 twins आता ड्युअल-चॅनल ABS ने सुसज्ज आहेत. दोन्ही मॉडेल्सच्या नियमित व्हर्जनमध्ये फक्त सिंगल-चॅनल एबीएस मिळतात. तसेच दोन्ही बाईक आता डार्क पेंट स्कीमसह येतात. कंपनी याला ब्रुकलिन ब्लॅक पेंट शेड म्हणते. दोन्ही मॉडेल्समधील पॅनेल्स मॅट आणि ग्लॉस पेंटचा वापर करण्यात आला आहे. यात सिल्व्हर पेंट हायलाइट म्हणून वापरला जातो. अलॉय व्हील, एक्झॉस्ट, इंजिन आणि इतर पार्टससह बाईकच्या इतर भागांवर ब्लॅक पेंट देखील आहे. Pulsar N250 आणि F250 या दोन्हींचे इंजिन आधीच्या मॉडेलप्रमाणेच आहे.
इतर महत्वाची बातमी:
टोयोटाच्या 'या' कारसाठी करावी लागेल तब्बल 3 वर्ष प्रतीक्षा, बुकिंगची रक्कम जाणून व्हाल थक्क
Car loan Information:
Calculate Car Loan EMI