Bajaj Pulsar NS200 : दिग्गज बाईक निर्माता कंपनी बजाज पल्सरने आतापर्यंत ग्राहकांसाठी बाईकचे अनेक नवनवीन व्हर्जन आणले आहेत. यामध्ये Pulsar N150 आणि Pulsar N160 च्या अपडेटेड व्हर्जन सादर केल्यानंतर, बजाज आता त्याच्या लोकप्रिय Pulsar NS200 ला मिड-लाईफ अपडेट देण्यासाठी सज्ज आहे. 2024 बजाज पल्सर NS200 चा टीझर देखील ब्रँडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. बजाज आपली आतापर्यंतची सर्वात मोठी पल्सर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या नवीन बजजा पल्सर बाईकचे नाव Pulsar NS400 असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आता या बाईकमध्ये आणखी काय काय वैशिष्ट्ये असतील या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


टीझरमध्ये काय आहे खास ?


बजाज पल्सरच्या नुकत्याच लॉन्च झालेल्या या टीझरमध्ये बाईकमध्ये नेमके कोणते खास बदल आणि वैशिष्ट्य असतील हे सांगणं तसं कठीणच आहे पण, टीझरमध्ये इंजिन कव्हर आणि '200' बॅजिंग दाखविण्यात आलं आहे. यातून हे स्पष्टपणे दिसते की, नवीन पल्सर मॉडेल हे अपडेटेड 2024 बजाज पल्सर NS200 असेल.


बाईकची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत?  


2024 बजाज पल्सर NS200 नेकेड रोडस्टरला नवीन डिजिटल डॅश मिळण्याची शक्यता आहे, जी अलीकडेच पल्सर N150 आणि N160 सह सादर करण्यात आली आहे. या मोटरसायकलला अद्ययावत स्विचगियर देखील मिळण्याची शक्यता आहे. सध्याची मोटरसायकल डिजी-ॲनालॉग डिस्प्लेने सुसज्ज आहे, जी आजकाल जुनी दिसते. नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर फोन ॲपद्वारे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीला समर्थन देईल, जे ग्राहकांना कॉल करण्यास आणि सूचना प्राप्त करण्यास अनुमती देते. 


इंजिन कसं असेल?


नवीन Pulsar NS200 मध्ये काही स्टाइलिंग बदलांसह नवीन रंग पर्याय आणि नवीन ग्राफिक्स मिळण्याची शक्यता आहे. ही बाईक 200cc, लिक्विड-कूल्ड, ट्रिपल स्पार्क, 4-व्हॉल्व्ह FI DTS-i इंजिनसह सुसज्ज असेल, जी 24.5PS पॉवर जनरेट करते आणि 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. हे वरच्या बाजूला फॉर्क्स आणि ड्युअल-चॅनेल ABS सह येईल.


महत्त्वाच्या बातम्या :


iPhone 16 Series : काय सांगता आता 40 मीटर खोल पाण्यातही फोटो आणि व्हिडीओ काढता येणार? अॅपलकडून यूजर्सना मोठं गिफ्ट


Car loan Information:

Calculate Car Loan EMI