Upcoming Bajaj and KTM Bikes: बजाज ऑटो आणि ऑस्ट्रेलियन दुचाकी उत्पादक KTM नवीन 650cc आणि 490cc इंजिन असलेल्या बाईक्सवर एकत्र काम करत आहेत. 650cc इंजिन असलेली बाईक केवळ चीन, युरोप आणि आशियाई बाजारपेठांमध्ये विकली जाईल. या दोन्ही कंपन्यांनी मिळून आतापर्यंत 10 लाखांहून अधिक बाईक्सचे उत्पादन केले आहे. 


Upcoming Bajaj and KTM Bikes: बजाजच्या कारखान्यात होणार नवीन बाईकचे उत्पादन


मिळालेल्या माहितीनुसार,भारतात KTM आपल्या Duke ला 650cc सेगमेंटमध्ये RC आणि अॅडव्हेंचर बाईक सादर करण्याच्या तयारीत आहे. ज्यासाठी कंपनी नवीन ट्विन-सिलेंडर इंजिन तयार करत आहे. या सर्व मोटारसायकली बजाजच्या कारखान्यात तयार केल्या जाणार असून, येत्या काही महिन्यांत या बाईक्स लॉन्चही केल्या जाऊ शकतात. तसेच KTM चीनच्या CF-Moto च्या भागीदारीत या नवीन बाईक्ससाठी एक नवीन प्लॅटफॉर्म देखील तयार करत आहे.


Upcoming Bajaj and KTM Bikes: बजाज 490cc ची बाईक आणणार 


लवकरच बजाज ऑटोकडून एक नवीन बाईक देखील पाहायला मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने नुकतेच नवीन 'ट्वीनर' नावाचा ट्रेडमार्क केला आहे. कंपनीने हे नाव दुचाकी आणि स्कूटरसाठी घेतले आहे. बजाज ऑटो आणि केटीएम भागीदारीत 490cc समांतर-ट्विन इंजिनवर काम करत आहेत. जे दोन्ही कंपन्या त्यांच्या आगामी मॉडेलमध्ये वापरतील.


Upcoming Bajaj and KTM Bikes: दोन्ही संभाव्य इंजिन


मीडिया रिपोर्टनुसार, 490 रेंजमधील सर्व मोटारसायकलींना 500cc पॅरलल-ट्विन इंजिन दिले जाईल, जे 55PS पेक्षा जास्त पॉवर जनरेट करण्यास सक्षम असेल. याला 270-डिग्री क्रँकशाफ्ट मिळेल. जो त्याला V-ट्विन इंजिनसारखा एक्झॉस्ट आवाज देईल. दुसरीकडे 650 रेंजच्या बाईकमध्ये 650cc इंजिन दिले जाईल, जे 80 ते 100Hp पॉवर जनरेट करू शकेल. हे दोन्ही इंजिन ट्रान्समिशनसाठी 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले जातील.


Upcoming Bajaj and KTM Bikes: रॉयल एनफिल्डशी करेल स्पर्धा (Royal Enfield Bikes in India) 


मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी भारतात फक्त Adventure, Duke आणि RC बाईक 490 आणि 650 सीरीज बाईक लॉन्च करणार आहे. जे रॉयल एनफिल्डशी (Royal Enfield Bikes in India) स्पर्धा करेल, कारण सध्या रॉयल एनफिल्ड (Royal Enfield Bikes in India) 250cc ते 650cc पर्यंतच्या सेगमेंटमध्ये जास्तीत जास्त मोटारसायकली विकते.


इतर ऑटो सेगमेंटशी संबंधित बातमी: 


Electric Vehicles in India: भारतात चार वर्षात तब्बल अडीच लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी; सरकारची लोकसभेत माहिती


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI