जर्मनीची प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी फॉक्सवॅगन येत्या 8 मार्चला भारतात आपली नवीन Virtus GT कार लॉन्च करणार आहे. कंपनीने आपल्या या नवीन कारचा टीझरही लॉन्च केला आहे. या कारमध्ये क्लास लीडिंग इंटिरियर्स आणि बूट स्पेस मिळण्याची शक्यता आहे. नवीन Volkswagen Virtus GT ची भारतात लॉन्च होणाऱ्या Skoda Slavia, Honda City, Hyundai Verna आणि Maruti Suzuki Ciaz यांच्याशी स्पर्धा होईल.


स्पेसिफिकेशन 


फॉक्सवॅगनने पोस्ट केलेला टीझर पाहता कंपनी आपली ही आगामी कार व्हर्टसच्या टॉप-स्पेक जीटी व्हर्जनमध्ये देखील आणू शकते, असे दिसत आहे. याच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, याच्या टीझरमध्ये असे दिसून येते की याला बाहेरून युनिक स्पोर्टी बिट्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये ग्राहकांना GT बॅज आणि अलॉय व्हीलसाठी वेगळे डिझाइन पाहायला मिळेल. 


इंजिन 


Volkswagen Virtus मध्ये 1.0-लिटर 3-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. जे 108 bhp ची पॉवर आणि 175 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले असेल. हे इंजिन 147 bhp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 7-स्पीड DSG गिअरबॉक्स दिला जाऊ शकतो.


फीचर्स आणि किंमत 


Volkswagen Virtu मध्ये ग्राहकांना एक इलेक्ट्रिक सनरूफ, एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, 6 एअरबॅग्ज, ऑटोमॅटिक एसी, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि एलईडी टेल-लाइट सारखे फीचर्स मिळू शकतात. कंपनी भारतात या कारची किंमत 10 लाख ते 15 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान ठेवू शकते. 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI