Tata Kaziranga Special Edition : देशातील प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आपली काझीरंगा एसयूव्ही रेंज लॉन्च केली आहे. . काझीरंगा हे नाव आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाशी संबंधित आहे. या स्पेशल एडिशन गाड्या शिंग असलेल्या गेंड्यांपासून प्रेरित आहेत. पियानो ब्लॅक फिनिशमध्ये ड्युअल टोन रूफसह नवीन ग्रासलँड बेज बॉडी कलर या कारसाठी विशेष म्हणून देण्यात आला आहे. हा रंग या एडिशनच्या सर्व एसयूव्हीवर (SUV) उपलब्ध असेल. उदाहरणार्थ क्रोमसह मानक सफारीच्या तुलनेत जेव्हा काळा एलिमेंट प्रदर्शित केला जातो तेव्हा हा रंग चांगला दिसतो. या कारसह वेगवेगळ्या अॅक्सेसरीज देखील देण्यात आल्या आहेत. तसेच या कारसह कस्टम मेड्स चाव्या देखील देण्यात आल्या आहेत.
टाटा पंच (Tata Punch)
कंपनीने लॉन्च केलेल्या काझीरंगा टाटा पंच बद्दल बोलायचे झाले तर, यात आता अर्थी बेज लेदरेट अपहोल्स्ट्री, पियानो ब्लॅक डोअर ट्रिम, अर्थी बेज ट्राय-एरो फिनिश डॅशबोर्ड मिड पॅड, ग्रॅनाइट ब्लॅक रूफ रेल, पियानो ब्लॅक ह्युमॅनिटी लाइन फ्रंट ग्रिल आणि जेट ब्लॅक 16-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहे. हा काझीरंगा एडिशन पर्सोना क्रिएटिव्ह एमटी, क्रिएटिव्ह एमटी-आयआरए, क्रिएटिव्ह एएमटी आणि क्रिएटिव्ह एएमटी-आयआरए सारख्या टॉप-एंड एडिशनशी सुसंगत असेल.
नेक्सन (Nexon)
ग्रासलँड बेज कलर व्हेरियंटसह नेक्सन काझीरंगा एडिशनला ड्युअल टोन अर्थी बेज लेदरेट अपहोल्स्ट्री, पियानो ब्लॅक डोअर ट्रिम अॅडिशन्स, एक्सक्लुझिव्ह वुड फिनिश डॅशबोर्ड मिनी-पॅड्स, ग्रॅनाइट ब्लॅक बॉडी क्लेडिंग्स आणि रूफ रेल, पियानो ब्लॅक ह्युमॅनिटी लाइन फ्रंट ग्रिल आणि जेट ब्लॅक 16 इंच अलॉय व्हील्स देखील देण्यात आले आहे. यासोबतच यात एअर प्युरिफायर आणि नवीन इलेक्ट्रो-क्रोमॅटिक IRVM देखील देण्यात आले आहेत. ग्राहक Nexon XZ+ आणि Nexon XZA+ व्हेरियंटमध्ये हे स्पेशल एडिशन Nexon घेऊ शकता. यात महत्वाचे म्हणजे हे स्पेशल एडिशन Nexon पेट्रोल / डिझेलसाठी आहे. हे स्पेशल एडिशन इलेक्ट्रिकमध्ये उपलब्ध नाही.
हॅरियर आणि सफारी (Harrier & Safari)
हॅरियर आणि सफारी दोघांनाही खास रंग, ड्युअल टोनच्या अर्थीच्या बेज लेदरेट सीट, डोर ट्रिम्स, ट्रॉपिकल वूड फिनिश डॅशबोर्ड मिड-पॅड, ग्रॅनाइट ब्लॅक बॉडी क्लेडिंग्स, पियानो ब्लॅक इन्सर्टसह ग्रॅनाइट ब्लॅक फ्रंट ग्रिल आणि हॅरियरमध्ये जेट ब्लॅक 17-इंच अलॉय व्हील मिळणार, तर सफारीत 18 इंच अलॉय व्हील मिळणार. याशिवाय सफारीमध्ये वायरलेस चार्जर, अॅपल कारप्ले / वाय-फायवर अँड्रॉइड ऑटो, एअर प्युरिफायर, कनेक्टेड टेक सारखे फीचर्स देखील ग्राहकांना मिळणार आहे.
मॉडेल आणि किंमत
- टाटा पंच - 8,58,900 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली).
- टाटा नेक्सन (पेट्रोल) - 11,78,900 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली).
- नेक्सन (डिझेल) - 13,08,900 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली).
- हॅरियर - 20,40,900 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली).
- सफारी (7S) - 20,99,900 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली).
हे देखील वाचा-
- E Vehicle : इलेक्ट्रिक वाहने प्रदूषण कमी करणार; #ShoonyaKaSafar नेमकं काय आहे?
- KIA Motors लवकरच भारतात Kia EV6 लॉन्च करणार, कारप्रेमींनो जाणून घ्या
- Cheapest Sedan Cars : या आहेत सर्वात स्वस्त सेडान कार, जाणून घ्या किमतीपासून फिचर्सपर्यंत
Car loan Information:
Calculate Car Loan EMI