Maruti Suzuki Dzire Cng : भारतीय कार बाजार झपाट्याने विस्तारत आहे. पेट्रोल आणि डिझेल कारसोबतच सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे पाहता कंपन्या आता आपल्या नवीन सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारवर काम करत आहेत. जर आपण फक्त CNG बद्दल बोललो तर, अलीकडेच टाटा मोटर्सने देखील CNG सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय ह्युंदाई आणि मारुती सुझुकीचा या सेगमेंटमध्ये आधीच वर्चस्व आहे. आपले वर्चस्व कायम ठेवण्याच्या दिशेने वाटचाल करत मारुती सुझुकी आपल्या आणखी एका कारचे CNG व्हेरिएंट लॉन्च करणार आहे. ही कार मारुती सुझुकीची सब-कॉम्पॅक्ट सेडान कार डिझायर आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, मारुतीच्या काही डिलरशिपकडे या नवीन अपकमिंग सीएनजी कारची बुकिंग सुरू झाली आहे. याशिवाय मारुतीने आपल्या शोरुमध्ये डीलर ट्रेनिंग ही सुरू केळी आहे. मारुती सुझुकीने यापूर्वी जानेवारीमध्ये सेलेरियोचा सीएनजी व्हेरिएंट लॉन्च केला होता. कंपनीने नवीन जनरेशन Celerio चा CNG व्हर्जन लाँच केला होता. या कारचे मायलेज 35 किमीच्या जवळपास असल्याचे सांगितले जात आहे.


आता कंपनी आपल्या Dzire चा CNG व्हर्जन घेऊन येत आहे. याचा नॉन-सीएनजी मॉडेलची भारतीय बाजारात Hyundai Aura, Tata Tigor आणि Honda Amaze शी स्पर्धा आहे. यापैकी Hyundai Aura आणि Tata Tigor या देखील CNG व्हर्जनमध्ये येत आहेत. त्यामुळे या कारशी DZire CNG मार्केटमध्ये स्पर्धा करेल. हे सर्व सबकॉम्पॅक्ट सेडान आहेत. कंपनी सध्या दर महिन्याला डिझायरच्या 10,000 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री करते. फेब्रुवारीमध्ये मारुतीने डिझायरच्या विक्रीत 46.5% वाढ झाली असून याच्या 17,438 युनिट्सची विक्री करण्यात आली आहे. दरम्यान, कंपनी लवकरच आपली ही कार भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे.  


हे देखील वाचा- 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI