Tesla Car in India : भारत पेचे माजी MD असलेल्या अश्नीर ग्रोव्हरचं एक ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी थेट टेस्लाच्या क्रॉस ब्रीड (Tesla) कारचा फोटो शेअर केला आहे. त्यात (Auto News) ही कार भारतात पहिल्यांदाच दिसल्याने या ट्विटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ATTO 3 ही असं या कारचं नाव आहे.  जगातील पहिली 'क्रॉस-ब्रीड' टेस्ला कार आहे. 



पोस्टमध्ये काय लिहिले आहे?



शेअर झाल्यापासून अश्नीर ग्रोव्हरच्या पोस्टला एक्सवर 1.8 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून या पोस्टला तीन हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. अश्नीर ग्रोव्हरने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "जगातील पहिली 'क्रॉस-ब्रीड' टेस्ला! दिल्लीतील एका मुलाने करोलबागमध्ये अक्षरशः आपले स्वप्न पूर्ण केले आहे. टेस्लाची ATTO 3 ही कार आहे. 


दिल्लीच्या करोल बागमध्ये अश्नीरने जी गाडी पाहिली आहे, ती BYD एअर टेस्लाचीही बॅजिंग करताना दिसली आहे. बीवायडी ही चिनी ऑटोमोबाईल कंपनी आहे आणि स्पॉटेड कारवरील बॅजिंगवरून असे दिसून येते की अश्नीरने पाहिलेल्या कारमध्ये टेस्ला आणि बीवायडी या दोन्हीची झलक आहे. दोन्ही कंपन्या कॉलॅबोरेशन करुन आपली इलेक्ट्रिक कार भारतात सादर करू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 


किंमत कमी असू शकते


बीवायडी आणि टेस्लायांच्या कोलॅबोरेशनमध्ये ही कार भारतात आल्यास त्याची किंमत कमी होण्याची शक्यता आहे. याबाबत अजून कोणतीही माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही. टेस्लाचे मालक इलॉन मस्क बऱ्याच दिवसांपासून टेस्ला कार देशात सादर करण्याच्या तयारीत असून या कोलॅबोरेशनमुळे लवकरच भारतात पहिली टेस्ला कार विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. 


भारतात किती कार विकल्या जातात?



बीवायडीने यापूर्वीच भारतात 200 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. कंपनी सध्या भारतात अनेक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करत आहे. यामध्ये अॅटो 3 इलेक्ट्रिक एसयूव्ही आणि ई 6 ईव्ही सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. कंपनी आता देशात इलेक्ट्रिक सेडान लाँच करणार आहे, जी या वर्षाच्या अखेरीस बाजारात येईल. 2022 मध्ये कंपनीने भारतात जवळपास 1,960 इलेक्ट्रिक कार विकल्या.






इतर महत्वाची बातमी-



Car loan Information:

Calculate Car Loan EMI