Renault Megane E-Tech in India : युरोपातील कार निर्माता कंपनी Renault Megane E-Tech ही कार पहिल्यांदाच भारतात स्पॉट करण्यात आली आहे. Megane E-Tech Hyundai Kona Electric च्या सेगमेंटमध्ये येते. ही कार अनेक युरोपीय बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विशिष्ट युनिट रेनॉल्टनेच भारतात आयात केलं आहे आणि ते भारतात चाचणी आणि वापरासाठी आणण्यात आलं आहे. कंपनी भारतात लॉन्च करण्यासाठी आधीच कारचे मूल्यांकन करत आहे, परंतु आत्तापर्यंत, त्या योजनांवर कोणतेही अपडेट उपलब्ध नाही.
Renault Megane E-Tech नेमकी कशी आहे?
2020 Megane eVision संकल्पनेचे उत्पादन मॉडेल, Megane E-Tech ची डिझाईन या संकल्पनेसारखीच आहे. या कारचा लूक फार सॉफ्ट आहे. एक्सटर्नल कलरवर अवलंबून, बंपरवर विरोधाभासी इन्सर्टसह, तळाशी क्लेडिंग मिळते. आतमध्ये, L-आकाराच्या मांडणीसह रेनॉल्टचा OpenR डिस्प्ले आहे, जो 12.3-इंच इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले आणि 12-इंच पोर्ट्रेट-शैलीतील इन्फोटेनमेंट टचस्क्रीनसह सुसज्ज आहे.
पावरट्रेन
Megane E-Tech CMF- ही एक इलेक्ट्रिक कार (Eklectric Car) आहे. ही कार इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. या कारमध्ये (Car) तुम्हाला साधारण दोन बॅटरी पॅकचे पर्याय देण्यात आले आहेत. यापैकी पहिला बॅटरी पॅक हा 40kWh चा आहे. आणि दुसरा बॅटरी पॅक 60kWh तसेच दोन मोटर आउटपुटसह उपलब्ध आहे. बेस 130hp आणि 250Nm, आणि अधिक पॉवरफुल 218hp आणि 300Nm. बॅटरी पर्यायावर अवलंबून आहे. रेनॉल्टने रेंज ही 470 किमी पर्यंत आहे असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
ही कार कोणाशी स्पर्धा करणार?
Renault Megane E-Tech या कारची विक्री प्रामुख्याने युरोपमध्ये केली जाते. अशा प्रकारे, ही कार लॉन्च झाल्यानंतर Hyundai Kona Electric, Mini Cooper SE आणि Kia Niro EV सह यांसारख्या इतर मॉडेलशी स्पर्धा करणार आहे.
भारतासाठी रेनॉल्टच्या कोणत्या योजना आहेत?
भारतासाठी, रेनॉल्ट CMF-A EV प्लॅटफॉर्मवर आधारित एंट्री-लेव्हल EV सादर करण्याचा विचार करत आहे. याशिवाय, कंपनी 2025 मध्ये देशात आपली नवीन डस्टर एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. भारतासाठी रेनॉल्टच्या सध्या या योजना आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
Electric Bike Update : 'या' कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटरसायकलच्या किंमती 10,000 रुपयांनी कमी केल्या; नवीन अपडेट्स वाचा
Car loan Information:
Calculate Car Loan EMI