Lamborghini Revuelto Supercar : लॅम्बॉर्गिनी इंडियाने नवी सुपरकार रेवुएल्टो (Lamborghini Revuelto Superca) भारतीय बाजारात लाँच केली आहे. मुंबईतील ग्रॅन्ड लाँचिंग इव्हेंटमध्ये ही कार लाँच करण्यात आली आहे. ही लॅम्बॉर्गिनीची भारतातील आतापर्यंतची सर्वात महागडी कार असल्याचं बोललं जात आहे. ही प्लगइन हायब्रिड V 12 इंजिनसह येणारी पहिली सुपरकार आहे. जी 100 किमी प्रति तास वेग पकडण्यासाठी केवळ 2.5 सेकंद घेते, असा दावा कंपनीने केला आहे. रेवुल्टोची किंमत 8.89 कोटी रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. कंपनी भारतात या गाडीची विक्री कम्प्लीट बिल्ड युनिट (सीबीयू) मार्गाने करणार आहे. डिलिव्हरी लवकरच सुरू होईल.
Lamborghini Revuelto Supercar Look :कशी असेल लॅम्बोर्गिनी रेव्ह्यूएल्टो?
-लॅम्बोर्गिनी रेव्ह्यूएल्टो ऑल-कार्बन मोनोकॉक चेसिसवर तयार करण्यात आली आहे.
-यात LED हेडलाइट्स, थर्मोप्लास्टिक बंपर, अॅल्युमिनियम गेट, Y- आकाराचे टेललाइट्स, रियर विंग आणि -ड्युअल एक्झॉस्ट टिप्स देण्यात आल्या आहेत.
-रेव्ह्यूएल्टो ची लांबी 4947 mm आहे. या गाडीचा व्हीलबेस 2779 mm आणि वजन 1,772 किलो ग्रॅम आहे.
-यात डोअर माउंटेड ओआरव्हीएम, लार्ज एअर स्कूप आणि पिरेली पी झिरो टायरसह 21 इंचाची अलॉय व्हील्स देण्यात आली आहेत. मागील बाजूस 2 एक्झॉस्ट टिप्स आणि नॅरो टेल लॅम्प आहेत.
लॅम्बॉर्गिनी रेव्ह्यूएल्टोला मिळणार V 12 इंजिन
-लॅम्बोर्गिनी रेव्ह्यूएल्टोमध्ये 6.5 लीटर V 12 इंजिन आहे. जे 9250rpm वर 803bhp पॉवर आणि 6750rpm वर 712Nm पीक टॉर्क जनरेट करते.
-हे इंजिन 2 इलेक्ट्रिक मोटर्ससह जोडले गेले आहे, जे पॉवर1,000ps (986bhp)पर्यंत वाढवते.
-ही कार 2.8 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग घेईल आणि 355 किमी प्रति तास वेगाने धावू शकेल.
- यात चार राइडिंग मोड देण्यात आले आहेत.
Lamborghini Revuelto Supercar Feature :कारमध्ये फीचर्स कोणते?
-रेव्ह्यूएल्टोमध्ये प्रीमियम डॅशबोर्डसह आरामदायक आणि स्पोर्टी टू सीटर केबिन आहे.
-यात 8.4 इंचाचा सेंट्रल टचस्क्रीन आणि 12.3 इंचाचा इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आला आहे.
-सेफ्टी फीचर्समध्ये मल्टीपल एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, नेव्हिगेशन, हिल असिस्ट आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
-डॅशबोर्डमध्ये 3D-प्रिंटेड AC व्हेंट आणि फ्लॅट-बॉटम मल्टीफंक्शनल स्टीअरिंग व्हीलचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे म्युझिक, ब्लूटूथ आणि ऑडिओ मॅनेज केलं जाऊ शकतात.
इतर महत्वाची बातमी-
Car loan Information:
Calculate Car Loan EMI