मुंबई : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात नवीन ऑडी क्यू७ लाँच केली. नवीन ऑडी क्यू७ मध्ये डायनॅमिक स्पोर्टीनेस आणि सुधारित आकर्षकतेचे परिपूर्ण संयोजन आहे, जेथे प्रत्येक वैशिष्ट्यामधून अत्याधुनिकता आणि क्षमता दिसून येते. लक्षवेधक डिझाइन अपडेट्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह नवीन ऑडी क्यू७ लक्झरी एसयूव्ही श्रेणीमध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करते. ऑडी क्यू७ प्रीमियम प्लस आणि ऑडी क्यू७ टेक्नॉलॉजी या दोन व्हेरिएण्टमध्ये ऑडी क्यू७ उपलब्ध असून याची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे ८८,६६,००० आणि ९७,८१,००० रुपये आहे.
ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “आतापर्यंत, आम्ही भारतात १०,००० हून अधिक ऑडी क्यू७ ची विक्री केली आहे, ज्यामधून अनेक वर्षांपासून बेस्ट सेलर असलेल्या आमच्या प्रमुख वेईकलप्रती सातत्यपूर्ण महत्त्वाकांक्षा व प्रेम दिसून येते. नवीन ऑडी क्यू७ मध्ये नवीन डिझाइन, विविध अपडेटेड वैशिष्ट्ये आणि क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह व ३लिटर व्ही६ इंजिन आहे. मला विश्वास आहे की, ही नवीन ऑडी क्यू७ ड्रायव्हिंग करण्याची आवड असण्यासोबत ड्राइव्ह केल्या जाणाऱ्या एसयूव्ही ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल.’’
ठळक वैशिष्ट्ये:
ड्राइव्ह आणि कार्यक्षमता:
• शक्तिशाली ३.० लिटर व्ही६ टीएफएसआय इंजिनची शक्ती, जे ३४० एचपी शक्ती आणि ५०० एनएम टॉर्क देते, तसेच उच्च दर्जाचा परफॉर्मन्स व कार्यक्षमतेसाठी ४८ व्होल्ट माइल्ड हायब्रिड तंत्रज्ञानासह अधिक सुधारित
• फक्त ५.६ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करते, अव्वल गती २५० किमी/तास आहे, ज्यामधून वेईकलची प्रभावी परफॉर्मन्स क्षमता दिसून येतात
• सर्व ड्रायव्हिंग स्थितींमध्ये उच्च दर्जाचे घर्षण व स्थिरतेसाठी क्वॉट्रो परमनण्ट ऑल-व्हील ड्राइव्ह
• अॅडप्टिव्ह एअर सस्पेंशन व ऑडी ड्राइव्ह सिलेक्टसह ७ ड्रायव्हिंग मोड्स, तसेच वैविध्यपूर्ण ड्रायव्हिंग अनुभवासाठी ऑफ-रोड मोड
• विनासायास पॉवर डिलिव्हरीसाठी स्मूथ-शिफ्टिंग एट-स्पीड टिप्ट्रॉनिक ट्रान्समिशन
एक्स्टीरिअर:
• आकर्षक नवीन डिझाइनमध्ये मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प्ससह डायनॅमिक इंडीकेटर्स आणि एलईडी रिअर कॉम्बीनेशन लॅम्प्स आहेत, ज्यामुळे व्हिजिबिलिटी व स्टाइलमध्ये वाढ झाली आहे
• अत्याधुनिक ५ ट्विन-स्पोक डिझाइन असलेले नवीन आर२० अलॉई व्हील्स
• नवीन सिंगल-फ्रेम ग्रिलसह व्हर्टिकल ड्रॉपलेट इन्ले डिझाइन, जे वेईकलच्या आकर्षकतेमध्ये अधिक भर करतात
• अधिक आक्रमक व स्पोर्टी लुकसाठी नवीन एअर इनटेक व बम्पर डिझाइन
• नवीन डिफ्यूजरसह रिडिझाइन करण्यात आलेले एक्झॉस्ट सिस्टम ट्रिम्स, जे क्यू७ च्या डायनॅमिक अपीलमध्ये अधिक भर करतात
• पुढील व मागील बाजूला नवीन द्विमितीय रिंग्ज, ज्या ऑडीच्या आधुनिक ब्रँड ओळखीला वाढवतात
• पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध - साखीर गोल्ड, वेटोमो ब्ल्यू, मिथोस ब्लॅक, ग्लेशियर व्हाइट आणि समुराई ग्रे
आरामदायीपणा व तंत्रज्ञान:
• सहजपणे पार्किंग व अधिक सुरक्षिततेसाठी पार्क असिस्ट प्लससह ३६०-डिग्री कॅमेरा
• सोईस्कर अॅक्सेससाठी सेन्सर-नियंत्रित बूट लिड कार्यसंचालनासह कम्फर्ट की
• प्रीमियम केबिन अनुभवासाठी ४-झोन क्लायमेट कंट्रोलसह एअर आयोनायझर व अॅरोमटायझेशन;
• प्रतिकूल हवामान स्थितींमध्ये सुधारित व्हिजिबिलिटीसाठी एकीकृत वॉश नोझल्ससह अॅडप्टिव्ह विंडस्क्रिन वायपर्स
इंटीरिअर आणि इन्फोटेन्मेंट:
• ऑडी व्हर्च्युअल कॉकपीट प्लस पूर्णत: डिजिटल व कस्टमायझेबल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर देते
• सर्वोत्तम ऑडिओ अनुभवासाठी बँग अँड ओलूफसेन प्रीमियम ३डी साऊंड सिस्टमसह १९ स्पीकर्स व ७३० वॅट आऊटपुट
• अधिकतम वैविध्यतेसाठी सेव्हन-सीटर कन्फिग्युरेशनसह इलेक्ट्रिकली फोल्डेबल थर्ड-रो सीट्स
• वेईकलमधील फंक्शन्सवर सर्वोत्तम नियंत्रणासाठी एमएमआय नेव्हिगेशन प्लससह टच रिस्पॉन्स
• ड्रायव्हर सीटसाठी नवीन सिडार ब्राऊन क्रिकेट लेदर अपहोल्स्टरीसह मेमरी वैशिष्ट्य
• सोईस्कर कनेक्टीव्हीटीसाठी ऑडी फोन बॉक्ससह वायरलेस चार्जिंग
• दोन आकर्षक इंटीरिअर रंग पर्याय: सिडार ब्राऊन आणि सैगा बीज
सुरक्षितता:
• नकळत लेन ड्रिफ्टिंगला प्रतिबंध होण्यास मदत करण्यासाठी लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टम
• अधिक सुरक्षिततेसाठी संपूर्ण केबिनमध्ये धोरणात्मकरित्या बसवलेल्या आठ एअरबॅग्ज
• सुधारित वेईकल स्थिरता व नियंत्रणासाठी इलेक्ट्रॉनिक स्टेबिलायझेशन प्रोग्राम
मालकीहक्क फायदे:
• २ वर्षांची स्टॅण्डर्ड वॉरंटी
• १०-वर्ष कॉम्प्लीमेण्टरी रोडसाइड असिस्टण्ससह जवळपास ७ वर्षांपर्यंत एक्स्टेण्डेड वॉरंटी एक्स्टेंशन खरेदी करण्याचा पर्याय
• ७-वर्ष पीरियोडिक मेन्टेनन्स आणि सर्वसमावेशक मेन्टेनन्स पॅकेजेस्.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI