मुंबई :  ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज त्‍यांच्‍या फ्लॅगशिप एसयूव्‍हीची एक्‍सक्‍लुसिव्‍ह व्‍हर्जन ऑडी क्‍यू7 सिग्‍नेचर एडिशन लाँच केली आहे. या कारमध्‍ये प्रीमियम डिझाइन घटक आणि लक्‍झरीअस सुविधांचे सर्वोत्तम कलेक्‍शन आहे. सिग्‍नेचर एडिशन काळजीपूर्वक निवडलेल्‍या सुधारणांच्‍या माध्‍यमातून क्‍यू7 ची लक्षवेधक उपस्थिती वाढवते. ज्‍यामध्‍ये नाविन्‍यपूर्ण ऑडी रिंग्‍ज एण्‍ट्री एलईडी लॅम्‍प्‍स, डायनॅमिक व्‍हील हब कॅप्‍स आणि नाविन्‍यपूर्ण इस्‍प्रेसो मोबाइल इन-वेईकल कॉफी सिस्‍टम आहे. 99,81,000 रुपयांपासून (एक्‍स-शोरूम) किंमत सुरू होणारी ऑडी क्‍यू7 सिग्‍नेचर एडिशन आपल्‍या मालकीच्‍या प्रीमियम एसयूव्‍हीमध्‍ये विशिष्‍टतेची मागणी करणाऱ्या ग्राहकांसाठी बीस्‍पोक लक्‍झरी अनुभव देण्‍याप्रती ऑडीच्‍या कटिबद्धतेला सादर करते. 

ऑडी क्‍यू7 सिग्‍नेचर एडिशन मर्यादित युनिट्समध्‍ये उपलब्‍ध आहे. ही कार साखीर गोल्‍ड, वेटोमो ब्‍ल्‍यू, मिथोस ब्‍लॅक, ग्‍लेशियर व्‍हाइट आणि समुराई ग्रे या पाच आकर्षक एक्‍स्‍टीरिअर रंगांमध्‍ये येते. ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, की “ऑडी क्‍यू7 भारतातील लक्‍झरी एसयूव्‍ही सेगमेंटमध्‍ये मापदंड स्‍थापित करत आहे. जिथे लक्षवेधक कार्यक्षमता आणि तडजोड न करणाऱ्या लक्‍झरीचे परिपूर्ण संयोजन देते. सिग्‍नेचर एडिशन विचारपूर्वक डिझाइन केलेल्‍या घटकांना सादर करत या वारसाला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. हे घटक मालकीहक्‍क अनुभव खास करतात. वैशिष्‍ट्यपूर्ण ऑडी रिंग्‍स प्रोजेक्‍शन लाइटपासून नाविन्‍यपूर्ण इस्प्रेसो मोबाइल सिस्‍टमपर्यंत प्रत्‍येक सुधारणा ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्‍यासाठी निवडण्‍यात आली आहे, जे त्‍यांच्‍या वेईकलकडे त्‍यांच्या सुधारित जीवनशैलीचे विस्‍तारीकरण म्‍हणून पाहतात आणि सर्वोत्तम ऑटोमोटिव्‍ह कारागिरीचे कौतुक करतात.

सिग्‍नचेर एडिशनची वैशिष्‍ट्ये:

सिग्‍नचेर एडिशन पॅकेज ऑडी क्‍यू7 साठी बीस्‍पोक स्‍टायलिंग सुधारणा देते. हे विशेष पॅकेज विशिष्‍ट लुक देण्‍यासह पुढील वैशिष्‍ट्ये देते:

• ऑडी रिंग्‍स एण्‍ट्री एलईडी लॅम्‍प्‍स, जे आकर्षक वेलकम लाइट प्रोजेक्‍शन निर्माण करतात (नवीन).

• डायनॅमिक व्‍हील हब कॅप्‍स, जे चाक गतीमध्‍ये असताना देखील परिपूर्ण ऑडी लोगो ओरिएन्‍टेशन कायम ठेवतात (नवीन).

• वेईकल अॅक्‍सेसकरिता प्रीमियम अनुभवासाठी मेटलिक की कव्‍हर (नवीन).

• स्‍टेनलेस स्‍टील पेडल कव्‍हर्स स्‍पोर्टी इंटीरिअर अॅसेंटची भर करतात (नवीन).

• अनपेक्षित इन-वेईकल पेय अनुभसाठी इस्‍प्रेसो मोबाइल कॉफी सिस्‍टम (नवीन).

• ऑडी डॅशकॅमसह ऑडी युनिव्‍हर्सल ट्रॅफिक रेकॉर्डर ड्रायव्हिंग करताना आणि कार पार्क केली असताना अतिरिक्‍त संरक्षण देते (नवीन).

• आकर्षक लुकसाठी नवीन आर२० अलॉई व्‍हील्‍सवर स्‍पेशल अलॉई व्‍हील पेंट डिझाइन (नवीन).

ऑडी क्‍यू७ ची इतर वैशिष्‍ट्ये:

• शक्तिशाली 3.0 लिटर व्‍ही6 टीएफएसआय इंजिनची शक्‍ती, जे 340 एचपी शक्‍ती आणि 500 एनएम टॉर्क देते, सोबत उच्‍च दर्जाचे परफॉर्मन्‍स व कार्यक्षमतेसाठी 48 व्‍होल्‍ड माइल्‍ड हायबिड तंत्रज्ञान.

• फक्‍त 5.6 सेकंदांमध्‍ये 0 ते 100 किमी/तास गती प्राप्‍त करते, टॉप स्‍पीड 250 किमी/तास आहे, ज्‍यामधून कारची प्रभावी परफॉर्मन्‍स क्षमता दिसून येते.

• सर्व ड्रायव्हिंग स्थितींमध्‍ये उच्‍च दर्जाचे घर्षण व स्थिरतेसाठी क्‍वॉट्रो परमनण्‍ट ऑल-व्‍हील ड्राइव्‍ह.

• वैविध्‍यपूर्ण ड्रायव्हिंग अनुभवासाठी अॅडप्टिव्‍ह एअर सस्‍पेंशन आणि ऑडी ड्राइव्‍ह सिलेक्‍टसह 7 ड्रायव्हिंग मोड्स, तसेच ऑफ-रोड मोड आहे.

• विनासायास पॉवर डिलिव्‍हरीसाठी सहजपणे शिफ्ट होणारे एट-स्‍पीड टिप्‍ट्रॉनिक ट्रान्‍समिशन.

• सात-आसनी कन्फिग्‍युरेशनसह अधिक वैविध्‍यतेसाठी इलेक्ट्रिकली फोल्‍डेबल थर्ड-रो सीट्स.

• ऑडी व्‍हर्च्‍युअल कॉकपीट प्‍लस पूर्णत: डिजिटल व कस्‍टमायझेबल इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर देते.

• सर्वोत्तम ऑडिओ अनुभवासाठी बँग अँड ओलुफ्सेन प्रीमियम ३डी साऊंड सिस्‍टमसह 19 स्‍पीकर्स आणि 730 वॅट्स आऊटपुट.

• वेईकल फंक्‍शन्‍सवर सर्वोत्तम नियंत्रणासाठी एमएमआय नेव्हिगेशन प्‍लससह टच प्रतिसाद.

• सोईस्‍कर कनेक्‍टीव्‍हीटीसाठी ऑडी फोन बॉक्‍ससह वायरलेस चार्जिंग.

• प्रभावी पार्किंग आणि अधिक सुरक्षिततेसाठी पार्क असिस्‍ट प्‍लससह 360 -डिग्री कॅमेरा.

• सोईस्‍कर अॅक्‍सेससाठी कम्‍फर्ट कीसह सेन्‍सर-नियंत्रित बूट लिड ऑपरेशन.

• प्रीमियम केबिन अनुभवासाठी ४-झोन क्‍लायमेट कंट्रोलसह एअर आयोनायझर आणि अरोमॅटायझेशन.

• प्रतिकूल हवामान स्थितींमध्‍ये सुधारित दृश्‍यमानतेसाठी अॅडप्टिव्‍ह विंडस्क्रिन वायपर्ससह एकीकृत वॉश नोझल्‍स.

• नकळतपणे लेन बदलण्‍याला प्रतिबंध करण्‍यास मदत करण्‍यासाठी लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्‍टम.

• अधिक संरक्षणासाठी संपूर्ण केबिनमध्‍ये धोरणात्‍मकरित्‍या बसवलेल्‍या आठ एअरबॅग्‍ज.

• सुधारित वेईकल स्थिरता व नियंत्रणासाठी इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलायझेशन प्रोग्राम.

ऑडी क्‍यू7 सिग्‍नेचर एडिशन विशेषत: टेक्‍नॉलॉजी व्‍हेरिएण्‍टसह येते आणि सिग्‍नेचर एडिशनमधील विशेष वैशिष्‍ट्ये ऑडी जेन्‍यूएन अॅक्‍सेसरीजचा भाग आहेत.

महत्वाच्या बातम्या:

ऑडीकडून A4 Signature Edition लाँच, किंमत अन् फीचर्स काय? जाणून घ्या एका क्लिकवर


Car loan Information:

Calculate Car Loan EMI