मुंबई : जर्मन कार निर्माता ऑडीच्या (Audi) नवीन इलेक्ट्रीक कारचं (Electric Vehicle) बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. ऑडीने 10 ऑगस्ट 2023 पासून भारतात नवीन ऑडी क्यू8 ई-ट्रॉन (Audi Q8 E-tron) आणि ऑडी क्यू8 स्पोर्टबॅक ई-ट्रॉनचे (Audi Q8 Sportback E-tron) बुकिंग सुरू केलं आहे. येत्या आठवड्यात ऑडी या दोन नवीन इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत लाँच करणार आहे. नवीन ऑडी क्यू8 ई-ट्रॉन आणि ऑडी क्यू8 स्पोर्टबॅक ई-ट्रॉन या इलेक्ट्रिक रेंजमधील नवीन डिझाइन केलेल्या कार आहेत. नवीन फीचर्ससोबतच त्याची बॅटरी क्षमताही खूप जास्त आहे. या दोन्ही कार अधिक रेंज आणि ड्रायव्हिंगचा आनंददायी अनुभव देतात. एकदा चार्ज केल्यानंतर ते 600 किमीची रेंज देते.


ऑडी क्यू8 ई-ट्रॉन आणि स्पोर्टबॅक ई-ट्रॉनचं बुकिंग सुरु


ऑडी क्यू8 ई-ट्रॉन आणि ऑडी क्यू8 स्पोर्टबॅक ई-ट्रॉनचं बुकिंग 10 ऑगस्टपासून सुरू झालं आहे. ग्राहक या कार 5 लाख रुपयांमध्ये कार बुक करू शकतात. ऑडीची अधिकृत वेबसाइट किंवा शोरूमद्वारे या कार तुम्ही बुकिंग करु शकता. दोन्ही मॉडेल्स भारतात लवकरच लाँच होणार आहेत. त्यानंतरच किंमत जाहीर करण्यात येणार आहे.


दोन नवीन इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत लाँच होणार


ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लन यांनी सांगितलं की, "आम्ही आमची नवीन इलेक्ट्रिक वाहने ऑडी क्यू8 ई-ट्रॉन आणि ऑडी क्यू8 स्पोर्टबॅक ई-ट्रॉन काही दिवसांत लाँच करणार आहोत. या कार काही महिन्यांपूर्वीच जगभरात लाँच करण्यात आल्या आहेत. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी नवीन डिझाइन, अधिक बॅटरी क्षमता आणि रेंजसह इतर अनेक फिचर्ससह सुसज्ज उत्कृष्ट कार आणल्या आहेत."


ऑडी क्यू8 ई-ट्रॉन आणि ऑडी क्यू8 स्पोर्टबॅक ई-ट्रॉन सुधारित वायुगतिकी (Aerodynamics), चांगली चार्जिंग कार्यप्रदर्शन (Good Charging Performance) आणि वाढीव बॅटरी क्षमतेसह येतात. त्याची रेंज एसयूव्हीमध्ये 582 किमी आणि स्पोर्टबॅकमध्ये 600 किमीपर्यंत वाढवण्यात आली आहे. कारच्या पुढील भागामध्ये बदल करण्यात आले आहेत. क्यू8 मॉडेलचे नाव ऑडीच्या इलेक्ट्रिक कार मॉडेलच्या सगळ्यात वरती आहे.


नवीन ऑडी क्यू8 ई-ट्रॉन नऊ एक्‍सटीरियर कलर ऑप्शनमध्ये पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये मडेरा ब्राउन, क्रोनोस ग्रे, ग्लेशियर व्हाइट, मायथोस ब्लॅक, प्लाझ्मा ब्लू, सोनेरा रेड, मॅग्नेट ग्रे, सियाम बेज आणि मॅनहॅटन ग्रे यांचा समावेश आहे. कारच्या इंटिरिअर भागात, नवीन क्यू8 ई-ट्रॉन ओकापी ब्राउन, पर्ल बेज आणि ब्लॅक या तीन रंगांमध्ये लाँच केले जाईल.


ग्राहकांना नेहमी लक्षात ठेवण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून, ऑडी इंडियाने अलीकडेच इलेक्ट्रिक वाहन मालकांसाठी मायऑडीकनेक्ट अ‍ॅपवर चार्ज माय ऑडी पर्यायाच्या रूपात उद्योगातील पहिला उपक्रम लाँच केला आहे. हे वन स्टॉप सोल्यूशन आहे जेथे ऑडी ई-ट्रॉनच्या ग्राहकांना एकाच अ‍ॅपवर एकाधिक वाहन चार्जिंग भागीदारांना प्रवेश मिळेल.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI