Audi A4 launched In India : प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी ऑडीने आपली प्रीमियम ऑडी A4 भारतात नवीन रंगांमध्ये अपडेटसह लॉन्च केली आहे. कंपनीने या कारच्या किंमतीतही वाढ केली आहे. नवीन Audi A4 भारतात आता 43.12 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या प्रारंभिक किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. कंपनी प्रीमियम, प्रीमियम प्लस आणि टेक्नॉलॉजी या तीन प्रकारांमध्ये A4 सादर केली आहे.
2022 Audi A4 प्रकारानुसार किंमती
- प्रीमियम – 43.12 लाख रुपये
- प्रीमियम प्लस - 47.27 लाख
- टेक्नॉलॉजी – 50.99 लाख रुपये
(सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत)
नवीन अपडेट्स
ऑडी A4 मध्ये मिळालेल्या अपडेट्सबद्दल बोलायचे झाले तर हे कार आता दोन नवीन रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे. यामध्ये टँगो रेड आणि मॅनहॅटन ग्रे यांचा समावेश आहे. फीचर अपडेट्सबद्दल बोलायचे झाले तर, नवीन Audi A4 च्या टॉप टेक्नॉलॉजी ट्रिममध्ये फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील, 19 स्पीकर आणि B&O ऑडिओ सिस्टम आहे.
इतर फीचर अपडेट्समध्ये 10.1-इंचाची इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, ऑडीचा व्हर्च्युअल कॉकपिट डिस्प्ले, इलेक्ट्रिक ग्लास सनरूफ, वायरलेस चार्जिंग, लेदरेट अपहोल्स्ट्री, 30-कलर अॅम्बियंट लाइटिंग, थ्री-झोन ऑटो क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स, सहा एअरबॅग्ज, फ्रंट एंड रीअर. पार्किंग सेन्सर आणि मागील पार्किंग कॅमेरा देण्यात आला आहे.
ऑडीने नवीन A4 मध्ये पूर्वीचे इंजिन दिले आहे. हे 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 187 Bhp पॉवर आणि 320 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 7-स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशनशी (DCT) जोडलेले आहे. ही फ्रंट व्हील ट्रायवेट सेडान आहे. Audi A4 चा टॉप स्पीड 204 किमी/तास आहे आणि ही कार फक्त 7.3 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडू शकते.
या कारबद्दल बोलताना ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग ढिल्लन म्हणाले, “ऑडी A4 ही आमची सर्वाधिक विकली जाणारी सेडान आहे. आज आम्हाला फीचर अपडेट्ससह दोन नवीन रोमांचक रंग सादर करताना आनंद होत आहे. ऑडी A4 हे बहुआयामी उत्पादन आहे. या कारमध्ये 19 स्पीकर, B&O 3D साउंड सिस्टीम आणि फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील आहेत. जे ग्राहकांना नक्कीच आवडतील."
Car loan Information:
Calculate Car Loan EMI