औरंगाबाद : कोरोनाची लस कधी येणार हा प्रश्न होता. मात्र, आता ती लवकरच येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आरोग्य विभागानं ही लस देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. कोरोनावरची ही लस सुरुवातीला आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागातील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, फोटो आयडी यासह अन्य डेटा मागवण्यात आलेला आहे.


औरंगाबाद घाटी रुग्णालय, महानगरपालिका कर्मचारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांनी डेटा तयार करण्याचे काम देखील सुरू केले असून हे अंतिम टप्प्यात आले आहे. औरंगाबाद अकरा हजार आरोग्यसेवक डॉक्टर फिजिशियन परिचारिकांनी कर्मचाऱ्यांना ही लस देणार असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांनी दिली आहे. या अधिकारी-कर्मचाऱ्यांना लस देण्यासाठी लागणारा डेटाबेस तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना नंतरही लस पोलीस कर्मचारी आणि नंतर महसूल कर्मचाऱ्यांना दिले जाईल. आणि त्यानंतरच सामान्य नागरिकाला ही लस दिली जाणार असल्याचे संकेत देखील मिळत आहे.


मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, कोरोना डबलींग रेटचे सर्व विभागात शतक पूर्ण


कोरोनाची लस जानेवारी महिन्यापासून दिली जाईल. अशा प्रकारची देखील प्राथमिक माहिती मिळते आहे. त्यामुळे लसीबाबत ती उत्सुकता जानेवारीत संपेल, असं चित्र सध्या दिसत आहे. तर दुसरीकडे केंद्र व राज्य सरकारकडून सार्वजनिक आरोग्य विभागाला लसीबाबत तयारी करण्याच्या वेगवेगळ्या सूचनाही मिळत आहेत. सद्यस्थितीत मिळालेल्या माहितीनुसार ही लस सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. हा सर्व डेटाबेस 31ऑक्टोबरपर्यंत पाठवावा, असे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाने आहेत. त्या सोबतच कोरोना संपलेला नसल्याचे सांगत त्याकडे दुर्लक्ष करू नका, असंही सांगण्यात आलेलं आहे.


कसा तयार केला जातोय डेटाबेस
कोरोनाच्या लसीकरणासाठी आरोग्य विभागाने प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांचे नाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक व फोटो आयडी सविस्तर डेटा तयार केला जात आहे. औरंगाबाद घाटी रुग्णालय महापालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा तयार केला जात आहे. हा सर्व डेटा महिनाअखेरपर्यंत राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी हा डेटा उपयुक्त आहे. किंबहुना या डेटानुसारच लसीकरण होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.


Brazil COVID-19 vaccine trial | ब्राझीलमध्ये कोरोना लस चाचणीत स्वयंसेवकाचा मृत्यू