सत्तार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला आहे. सत्तार म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांनीच काँग्रेस पक्षाचं वाटोळं केलं आहे.
शिवसेना प्रवेशाबाबत सत्तार म्हणाले की, मी सत्तेसाठी शिवसेनेत आलो नाही. 2014 मध्ये मला भाजपकडून ऑफर होती. त्याअगोदर मी आघाडी सरकारमध्ये मंत्री होतो. तेव्हा जर मी भाजपमध्ये गेलो असतो तर पुन्हा मंत्री होऊ शकलो असतो. तसे केले असते तर लोक मला म्हणू शकले असते की मी सत्तेसाठी भाजपमध्ये गेलोय. परंतु मी तसे केले नाही.
सत्तार म्हणाले की, शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी मी शिवसेनेचा गेल्या पाच वर्षांतील कामांचा अभ्यास केला. गेली पाच वर्षे शिवसेना भाजपसोबत सत्तेत वाटेकरी असूनही शिवसेना सामान्यांसाठी सभागृहात सत्ताधाऱ्यांशीच लढली. शिवसेनेचे गेल्या पाच वर्षातील धोरण मला पटलं. त्यांचे नेते सत्तेत असूनही रस्त्यावर उतरले. त्यांचे मंत्री आमदार सत्तेत राहून बाहेर जनतेसोबत असतात, शेतकऱ्यांसोबत असतात ही सोपी गोष्ट नाही. या सर्व गोष्टींचा विचार करुनच मी शिवसेनेत आलो.
विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने अब्दुल सत्तार यांची तोंडी परीक्षा | तोंडी परीक्षा | ABP Majha