Sanjay Shirsat on Sanjay Raut : चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बाबरी मशिदी विद्ध्वंसावरुन (Babri Masjid Demolition) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातलं राजकारण तापलं आहे. भाजप, शिवसेना आणि ठाकरे गट यांच्या नेत्यांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत. या प्रकरणावरुन शिवसेना नेते (शिंदे गट) संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"चंद्रकांत दादा जे काही बोलले त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, विषय संपला होता तरी आता संजय राऊत म्हणतात यांच्या ढुंXXX वर लाथा मारा, खरं तर खरी लाथ संजय राऊत यांच्या ढुंXXX वर मारायला हवी. कारण यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आहे, असं संजय शिरसाट म्हणाले. तर चंद्रकांत पाटील हा आमच्यासाठी छोटा विषय असल्याचंही शिरसाट यांनी बोलून दाखवलं.
VIDEO : संजय राऊतांवर संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
हिंमत असेल चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या : संजय राऊत
दरम्यान, संजय राऊतांनी आज पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान असता कामा नये असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी चंद्रकांत पाटलांचा (Chandrakant Patil) राजीनामा घ्यावा असेही संजय राऊत म्हणाले. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पलटी मारण्यालाही मर्यादा आहेत असं म्हणत राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली.
शिरसाटांचा ठाकरे-पवार भेटीवर हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची मंगळवारी (11 एप्रिल) सिल्वर ओकवर येथील घरी जाऊन भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात दीड तास चर्चा झाली. या भेटीवर संजय शिरसाटांनी हल्लाबोल चढवला आहे. ते म्हणाले की, "कालची घटना तर दुर्दैवी म्हणावी लागेल. अमित शाह, अगदी मोदीजी मातोश्रीवर यायचे आणि काल उद्धवसाहेब पवार यांच्या घरी गेले, ही खरी विचारांशी प्रतारणा आहे, म्हणून पहिली लाथ यांना मारावी, यांनी मातोश्रीची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे."
ही तर राष्ट्रवादीची शिवसेनेसोबत साथ सोडायची तयारी
राष्ट्रवादी काँग्रेस आता एक पायावर आमच्यात यायला तयार असल्याचं मोठं वक्तव्य शिरसाटांनी केलं आहे. उद्धव साहेबांना सगळे सोडून जात आहेत याचं वाईट वाटत आहे. अजित पवार काहीही करु शकतात, कुठेही जाऊ शकतात. मला तर वाटते शरद पवारांचं अजित पवारांबद्दलचं वक्तव्य म्हणजे राष्ट्रवादीने टाकलेली गुगली आहे. याचा खरा अर्थ म्हणजे शिवसेनेची साथ सोडायची त्यांची तयारी सुरु असल्याचं शिरसाटांनी सांगितलं. तर अनेक उरलेले आमदार लवकरच आमच्यात दिसतील असाही दावा शिरसाटांनी केला आहे.