औरंगाबाद : अॅट्रॉसिटी प्रकरणात कन्नडचे माजी आमदार आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. एका पानटपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. औरंगाबादेतील क्रांती चौक पोलीस ठाण्यात जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांना अटक होण्याची शक्यता आहे. कारण, औरंगाबादच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अभिनंदन पाटणंगणकर यांनी हर्षवर्धन जाधव यांचा अर्ज फेटाळला आहे.


प्रकरणात पानटपरी चालक नितीन रतन दाभाडे(30, रा. बनेवाडी)यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, दाभाडे यांनी जिल्हा न्यायासमोरील सिग्नल जवळ पानटपरी सुरु केली व तेथे निळा झेंडा लावला. 29 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हर्षवर्धन जाधव तेथे आले. त्यांनी ज्या जागी टपरी व निळा झेंडा लावला ती जागा माझ्या मालकीची आहे. त्यामुळे टपरी व झेंडा हटव असे दाभाडे यांना सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला व जाधव यांनी दाभाडे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन टपरी व झेंडा हटवला नाही तर, जीवे मारीन अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. याप्रकारानंतर रविवारी रात्री दाभाडे यांनी क्रांतीचौक पोलिस ठाणे गाठत दिलेल्या तक्रारीवरुन हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजनांचा मनसेमध्ये प्रवेश

हर्षवर्धन जाधव यांना अटक होण्याची शक्यता

गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी जाधव यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता, सहाय्यक लोकाभियोक्ता अजीत अंकुश यांनी गुन्ह्याचा तपास प्राथमिक अवस्थेत असुन आरोपीला जामीन दिल्यास तो फीर्यादीवर दबाव आणु शकतो. त्यामुळे अरोपीला जामीन देण्यात येवु नये अशी विनंती न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.

हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल

MNS 14th Foundation Day | 'शॅडो कॅबिनेट' सरकारचे वाभाडे काढणार; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण