भरधाव कार चालकाने तीन वृद्ध महिलांना जालना रोडवर चिरडले. या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एका महिलेवर सामान्य घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात पावणेपाचच्या सुमारास जालना रोडवरील म्हाडा कॉलनीजवळ झाला. तुळसाबाई दामोदर गायकवाड (वय 70) आणि आशामती विष्णु गायकवाड (वय 40, दोघीही रा. देवठाणा, ता. मंठा, जि. जालना)अशी मृत महिलांची नावे आहेत. तर अहिल्याबाई दादाराव गायकवाड या गंभीर जखमी आहेत.
सोलापुरात एसटी आणि जीपचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
अपघातानंतर कारचालकाचे पलायन
जालन्याच्या मंठा तालुक्यातील गंगाधर दादाराव गायकवाड यांच्या मुलाचे जालना रोडवरील म्हाडा कॉलनी परिसरातील कांचन लॉन्समध्ये रविवारी विवाह आहे. त्यासाठी आज दुपारी काकू तुळसाबाई गायकवाड, आशामती विष्णु गायकवाड आणि अहिल्याबाई गायकवाड या एसटीने दुपारी औरंगाबादकडे निघाल्या होत्या. जालना रोडवरील धुत हॉस्पिटलसमोर या तिघीही सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास एसटीतून उतरल्या. यावेळी पायी जात असताना चिकलठाण्याहून सिडकोकडे भरधाव जाणाऱ्या कारचालकाने तिघींना चिरडले. कारचालकाने तिघींना दुरवर फरफटत नेले. या भीषण अपघातात तुळसाबाई, आशामती आणि अहिल्याबाई गंभीर जखमी झाल्या. यात तुळसाबाई आणि आशामती यांचा मृत्यू झाला. तर अहिल्याबाई यांना सामान्य घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच मुलगा तुळसाबाई यांचा मुलगा दिगंबर दामोदर गायकवाड, पुतण्या गंगाधर दादाराव गायकवाड यांच्यासह नातेवाईकांनी धाव घेतली. दरम्यान अपघात घडल्यानंतर कारचालकाने घटनास्थळावरुन धुम ठोकली. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अपघाताची नोंद एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Accident at Khandala Ghat | पुणे-बंगळुरु महामार्गावरील खंडाळा घाटात अपघात, तीन जणांचा मृत्यू