औरंगाबाद : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात एमआयएमने औरंगाबादेत महामोर्चा काढला. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. आझाद चौकातून या महामोर्चाला सुरुवात झाली. यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या महामोर्चात मुस्लीम बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले.


नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभर आंदोलनं सुरु आहेत. ईशान्य भारतातून सुरु झालेलं आंदोलनांच लोण आता महाराष्ट्रातही पोहचलं आहे. महाराष्ट्रात गेल्या चार दिवसांपासून विविध जिल्ह्यात आंदोलनं सुरु आहेत. औरंगाबादमध्ये आज एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात निदर्शने करण्यात आली. हातात तिरंगा घेऊन मुस्लीम समाजानं नागरिकत्व कायदा आणि एनआरसीला तीव्र विरोध दर्शवला.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात लोक रस्त्यावर -
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात काल (गुरुवारी)डाव्या संघटनांनी देशभरात आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. याची तीव्रत सर्वता अधिक उत्तर भारतात पाहायला मिळाली. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात आणि कर्नाटकात हिंसाचार, जाळपोळ झाली. लखौनत पोलिसांवर गोळीबार केल्याचीही घटना घडली. यादरम्यान, एकाचा मृत्यू झाला. वाराणसीतही तुफान दगडफेक झाली. दिल्लीच्या बहुतांश भागांत इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद करण्यात आली होती.

राज्यातील सर्वधर्मियांच्या हक्कांचं संरक्षण करणार : मुख्यमंत्री
नागरिकत्व कायद्याबाबत अनेक गैरसमज आहेत. या कायद्यावरुन देशासह राज्यात निदर्शनं होत आहेत. सुधारीत नागरिकत्व कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनात बाळगू नये. राज्यातील कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला राज्य शासन धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, सुधारीत नागरिकत्व कायदा मंजूर झाल्यानंतर देशात अशांतता, भिती आणि गैरसमजाचे वातावरण आहे.

हेही वाचा - नागरिकत्व कायद्यावरून गैरसमज नको, राज्यातील सर्वधर्मियांच्या हक्कांचं संरक्षण करणार : मुख्यमंत्री

CAA Protests | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात महाराष्ट्रात जागोजागी आंदोलन, काही ठिकाणी समर्थनार्थ मोर्चे

CAA Protest | आधी नमाज मग कायद्याविरोधात आवाज | औरंगाबाद | ABP Majha