Aurangabad News: नवरात्रोत्सवानिमित्त (Navratrotsav 2022) खरेदी केलेल्या भगर आणि भगरीचें पिठातून विषबाधा झाल्याची घटना औरंगाबादसह (Aurangabad) जालना (Jalna) जिल्ह्यात समोर आली असल्याने खळबळ उडाली आहे. विषबाधा झालेल्या व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. औरंगाबादच्या लासूर स्टेशन भागातील एकाच वेळी 13 जणांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. तर जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील 24 जणांना विषबाधा झाली आहे.
औरंगाबादच्या लासूर स्टेशन येथे नवरात्रोत्सवानिमित्त भगर व भगरीचें पीठ परिसरातील विविध गावांमधील ग्रामस्थांनी खरेदी केले होते. मात्र या भगरीचे सेवन केल्याने 13 ग्रामस्थांना विषबाधा झाली असल्याचं समोर आलं आहे. त्यांना पोट दुखणे, उलट्या, चक्कर येत असल्याने गावातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
बाधितांची प्रकृती स्थिर
या घटनेवर प्रतिक्रिया देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर म्हणाले, लासूर स्टेशन येथील दुकानातून संबंधितांनी भगर खरेदी केल्याचे समजले. यासंदर्भात अन्न व औषधी प्रशासन विभागास तपासणी करण्याबाबत सूचना करण्यात येईल. तर अन्नबाधा झालेल्यांची प्रकृती स्थिर आहे.
जालन्यात 24 जणांना विषबाधा...
औरंगाबाद प्रमाणे जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात देखील भगर व भगरीचें पिठातून विषबाधा झाल्याचं समोर आलंय. परतुर तालुक्यातील चार गावांमधील 24 जणांना विषबाधा झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात महिलांचा सर्वाधिक समावेश आहे. तर विषबाधा झालेल्या सर्वच व्यक्तींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Navratri 2022 Chondhala Devi: आगळीवेगळी प्रथा असलेल्या चौंढाळ्याच्या रेणुका मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात
- सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आधार कार्ड देऊ, पण गरबा कार्यक्रमांना धार्मिक रंग नको; विश्व हिंदू परिषदेच्या मागणीवर तरुणांची प्रतिक्रिया