Verul-Ajantha International Festival: छत्रपती संभाजीनगर शहरात (Chatrapati Sambhajinagar City) तब्बल सात वर्षांनंतर वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात आला असून, आजपासून (25 फेब्रुवारी) सायंकाळी सोनेरी महलामध्ये या महोत्सवाला सुरुवात होणार आहे. मागच्या काही वर्षात दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोनाच्या कारणाने हा महोत्सव झाला नाही. मात्र यंदा हा महोत्सव होत असून, 25, 26 आणि 27 फेब्रुवारी 2023 रोजी सोनेरी महाल येथे जागतिक दर्जाच्या सुप्रसिध्द कलाकारांमार्फत शास्त्रीय आणि उपशास्रीय, गायन, शास्त्रीय नृत्य सादर केले जाणार आहे. या महोत्सवामध्ये उस्ताद राशीद खान, उस्ताद सुजात खान, महेश काळे, रवी चारी, शिवमनी, विजय घाटे, संगीता मुजूमदार आणि शंकर महादेवन कला सादर करणार आहेत.  


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल परिसरात हा महोत्सव होणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार आपली कला सादर करणार आहेत. तब्बल सात वर्षांच्या खंडाने पुन्हा सुरू होत असलेल्या महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्याची व भारतीय अभिजात कला, नृत्य, साहित्य- संस्कृतीच्या संवर्धनासाठी वेरूळ -अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची सुरुवात करण्यात आली होती. तब्बल सात वर्षांच्या खंडानंतर हा महोत्सव पुन्हा सुरू होत आहे. महोत्सवाच्या प्रचार, प्रसारासाठी पूर्वरंग कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये स्थानिक कलाकारांनी आपल्या कला सादर करीत माहोल तयार केला आहे..


असा असणार तीन दिवसीय महोत्सव



  • 25 फेब्रुवारीला सायंकाळी 6  ते 12  दरम्यान 'त्रिपर्णा' मध्ये मयूर वैद्य आणि मृण्मयी देशपांडे आपली कला सादर करणार आहेत, तर प्रार्थना बेहेरे भरतनाट्यम् आणि भार्गवी चिरमुले लावणी सदर करणार आहेत. त्यानंतर पद्मभूषण पं. राशीद खान यांचे गायन, तर महेश काळे यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यानंतर पद्मश्री विजय घाटे आणि पं. राकेश चौरसिया यांची तबला आणि बासरीची जुगलबंदी ऐकायला मिळणार आहे.

  • 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 ते 10 वाजेदरम्यान उस्ताद शुजाद हुसैन खान (सितार व गायन), अमित चौबे (तबला), मुकेश जाधव (तबला), पद्मश्री शिवम्णी (तालवाद्य), रवि चारी (सितार), संगीत हळदीपूर ( पियानो), सेल्वा गणेश (खंजिरी), शेल्डन डिसिल्वा (बास गिटार), अदिती भागवत (कथ्थक) तर 

  • 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 ते 10 दरम्यान संगीता मुजूमदार (स्ट्रग्सि एन स्टेप्स ग्रुप, कथ्थक), नील रंजन मुखर्जी (हवायन गिटार), पद्मश्री शंकर महादेवन (उपशास्त्रीय, नाट्य व सुगम गायन) सादरीकरण करतील.


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! जी 20 च्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात ड्रोन कॅमेरा वापरण्यास मनाई आदेश