Gram Panchayat Election: बीड जिल्ह्यातील (Beed District) एकूण 704 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान (voting) होत आहे. दरम्यान मतदान सुरळीत सुरु असतानाच बीडच्या लिंबागणेश गावात अजब प्रकार समोर आला आहे. कारण सरपंच (Sarpanch) पदासाठी उमेदवार असलेल्या एका उमेदवाराच्या चिन्हासमोर असलेल्या निशाणीवर चक्क फेविक्विक (Feviquick) टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ईव्हीएम मशीनवरील (EVM Machine) बटण दबत नसल्याचे मतदारांच्या लक्षात आल्यावर हा सर्व प्रकार समोर आला आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, लिंबागणेश गावासाठी आज ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. यासाठी सकाळपासून गावातील जिल्हा परिषेद शाळेत मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु होती. दरम्यान याच गावातील गणेश कल्याण वाने हे सरपंच पदासाठी रिंगणात आहे. मात्र मतदान सुरु असतानाच वाने यांच्या तीन नंबरवर असलेल्या शिटी निशाणीसमोरील बटणावर अज्ञात व्यक्तीने फेविक्विक टाकले. ईव्हीएम मशीनवरील बटण दबत नसल्याचे मतदारांच्या लक्षात आल्यावर हा सर्व प्रकार समोर आला आहे. 


गुन्हा दाखल करणार... 


ईव्हीएम मशीनवर फेविक्विक टाकल्याची घटना समोर आल्यावर तब्बल एक तास मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी मतदान केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. तसेच याप्रकरणी गणेश वाने यांना तक्रार देण्याच्या सूचना केल्या असून, संबधित व्यक्तीवर गुन्हा दाखल दाखल करण्याच्या सूचना देखील उपविभागीय अधिकारी यांनी दिल्या आहे. मात्र या घटनेची जिल्हाभरात चर्चा पाहायला मिळत आहे. 


बोगस मतदानाचा आरोप 


दुसऱ्या एका घटनेत बोगस मतदान केल्याचा आरोप करत उमेदवारांनी गोंधळ घातल्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील टोकवाडी येथे समोर आला आहे. मतदार यादीत नाव नसतानाही एकजण मतदान केंद्रात उपस्थित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकारानंतर मतदान केंद्राच्या बाहेर काही वेळेसाठी गोंधळ पाहायला मिळाला. मात्र तिथे उपस्थित असल्याने लोकांनी प्रकरण मिटवल. 


'त्या' कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल... 


दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीत वडवणी तालुक्यात निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांसह इतर विभागातील 6 कर्मचाऱ्यांवर मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या कामकाजात हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे. ही बाब निदर्शनास येताच वडवणीचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. 


सविस्तर बातमी...  Beed Grampanchayat Election: बीड: ग्रामपंचायत निवडणुकीच्या कर्तव्यात कसूर; वडवणीत 6 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल