Marathwada Rain Update: दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यात गेली दोन वर्षे वरुणराजाने साथ दिल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. यावर्षी सुद्धा पाऊस चांगला असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड हे तीन जिल्हे सोडले तर लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबारपेरणीचे संकट घोंगावत आहे. तर  यंदा 39 टक्के कमी पाऊस झाला आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस.... (1 जून ते 2 जुलैदरम्यान)

जिल्हा

अपेक्षीत पाऊस

प्रत्यक्ष पाऊस

टक्केवारी

औरंगाबाद

135

143.4

106.2

जालना

143.3

151.1

105.4

बीड

136.6

150.1

101.8

लातूर

135.7

113.6

83.7

उस्मानाबाद

171.2

158.1

92.3

नांदेड

159.4

140.8

88.3

परभणी

125.9

119.6

95

हिंगोली

184.1

142.1

77.2

एकूण

146

147.2

100.8

उद्यापासून पावसाची शक्यता...

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईसह राज्यभरात 5 जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्यात मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. तसेच मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे. तर ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील.

दुबार पेरणीचे संकट...

सुरवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या आहे. मात्र औरंगाबाद, जालना, बीड हे तीन जिल्हे सोडले तर इतर जिल्ह्यात अजूनही अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. तर काही ठिकाणी पिकांना पाण्याची नित्यांत गरज आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.