Aurangabad News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. यासाठी शिवसेनेकडून जवळपास संपूर्ण तयारी झाली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची सभा निर्विघ्न पार पडावी यासाठी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडून होमहवन करत पूजा करण्यात येत आहे. गेल्या 7 दिवसांपासून दौलताबादच्या दक्षिणमुखी मारुतीच्या मंदिरात ही पूजा सुरु आहे. 


उद्धव ठाकरेंच्या सभेत कोणत्याही प्रकारे अडथळे येऊ नयेत म्हणून 1 तारखेपासून एकूण 11 ब्राम्हणांच्या  उपस्थित हनुमंताची आराधना करण्याची पूजा सुरु आहे. दौलताबादच्या दक्षिणमुखी मारुतीच्या मंदिरात ही पूजा सुरु आहे. यावेळी पूजा करणाऱ्या ब्राम्हण यांनी केलेल्या दाव्यानुसार, अशी पूजा केल्याने आलेले सर्व संकटे दूर होतात. सर्व कार्य आपल्या मनाप्रमाणे होतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सभेत सुद्धा कोणतेही अडचण निर्माण होऊ नयेत आणि सभा चांगली पार पडावी म्हणून पूजा केली जात असल्याच शिवसैनिक म्हणाले. 


आणखी एक टीझर....


उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेकडून आतापर्यंत अनेक टीझर जारी करण्यात आले आहेत. त्यातच आता सभेच्या एक दिवस आधी सुद्धा आणखी एक टीझर जारी करण्यात आला आहे. या टीझरमध्ये बाळासाहेबांनी औरंगाबादच्या नामांतराची केलेली मागणीचा भाषण दाखवण्यात आला आहे. सोबतच, लाखोचा भगवा गजर, आपलं संभाजीनगर...सिंहगर्जना घुमणार खरे हिंदुत्व काय? हे संभाजीनगर सांगणार,भगवी पताका फडकणार हिंदुत्वाचाझेंडा उंच राहणार,प्रखर हिंदुत्वासाठी भगव्या एल्गारासाठी हिंदुत्वाचा नारा दुमदुमणार सर्वत्र भगवे वादळ घुमणार,शिवबंधन दृढ राहणार हिंदुत्व चेतवणार,हिंदुत्वाचा गजर चलो संभाजीनगर...असे टीझरमध्ये म्हटल आहे.


मनसेची टीका... 


मनसे नेते गजानन काळे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "होय.. संभाजीनगर असे म्हणत बॅनरबाजी करायची.. मी संभाजीनगर म्हणतोय ना असं सभेत म्हणायच, एवढं करून झालं का? औरंगाबादचे संभाजीनगर कधी होणार मुख्यमंत्री महोदय?, संभाजीनगरला असलेलं औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबूत करायची घोषणा सभेत होणार का?, भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरून आल्यावर अवघड वाटतंय सगळं' अशी टीका काळे यांनी केली आहे. त्यामुळे शिवसेना-मनसेमध्ये पुन्हा एकदा एकमेकांवर टीका केली जाण्याची शक्यता आहे.