Aurangabad News: आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आरक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. ज्यात औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या 70  गटासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अनेक प्रस्थापितांचे हक्काचे गट राखीव झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. आरक्षण सोडतीत हक्काचे गट राखीव झाल्यामुळे जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना सुद्धा आता यांना धक्का बसला आहे. तर माजी मंत्री संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांनाही आता दुसरा गट शोधावा लागणार आहे. 


जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांचा गट ओबीसी पुरुष राखीव झाला, तर उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड यांचा गट सर्वसाधारण महिला राखीव झाला आहे. शिक्षण समिती सभापती अविनाश गलांडे यांचा महिला राखीव झाला आहे. तर विलास भुमरे यांचा गट सर्वसाधारण महिलासाठी राखीव असल्याने त्यांना आता दुसऱ्या गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणर आहे. 


असे असणार आरक्षण..


जिल्हा परिषदाच्या गटासाठी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार एकूण 70 गट असणार आहे. ओबीसीसाठी 18 जागा ज्यात 9 महिलांसाठी राखीव, अनुसूचित जातीसाठी 9 जागा ज्यात 5  महिलांसाठी राखीव, अनुसूचित जमाती 4  जागा ज्यात 2  महिलांसाठी राखीव आणि खुल्या प्रवर्गासाठी 39 गट जागा ज्यात 19  महिला राखीव असणार आहे. 


महिलांसाठी आरक्षण 



  • अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव: जेहूर, बालानगर, गदाना, गोंदेगाव, बाबरा 

  • अनुसुचित जमातीच्या महिलांसाठी राखीव: कुंजखेडा,संवदगाव 

  • ओबीसी महिला राखीव महिलासाठी राखीव: डोंगरगाव, डावलवाडी, भराडी, अंधारी, पळशी, भवन, हतनूर, वाकला शिवूर 

  • सर्वसाधारण महिलांसाठी राखीव: शिवना, नागद, चिंचोली लिंबाजी, पाल, बाजारसावंगी, लाडगाव, चोरवाघलगाव, महालगाव, अनंतपुर(सावंगी), शेंदुरवाद, लाडसावंगी, गोलटगाव, वडगाव कोल्हाटी, पंढरपुर, आडगाव. बु.,पिंप्री, पाचोड, पिंपळवाडी पिराची 


महत्वाच्या बातम्या...


OBC Reservation : सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का; 'त्या' जागांवरील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच


ठरलं! भाजप-शिंदे गट महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवणार; जागा वाटपाची प्राथमिक बैठकही झाली