Aurangabad News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेतील तांत्रिक गोंधळामुळे बी.ए., बी.कॉम., बी.सी.ए. अशा विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊनही गुणपत्रिकेवर काही विषयात शून्य गुण दाखवण्यात आले आहेत. याबाबत विद्यार्थी आणि पालकांनी आक्षेप घेतल्यानंतर विद्यापीठाने पत्र काढत गुण पडताळणी (exam paper rechecking application) व उत्तरपत्रिकेच्या छायांकीत प्रतिसाठी शुल्क भरुन अर्ज सादर करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष पाहायला मिळत असून, विद्यापीठाच्या चुकांचा भुर्दंड विद्यार्थ्यांना का असा प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे. 


काय आहे प्रकरण...


6 ऑगस्ट रोजी मराठवाडा विद्यापीठाच्या बीएय, बीकॉम, बीएससीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र यावेळी जाहीर करण्यात आलेल्या अनेक विद्यार्थी यांचे ग्रेड शून्य दाखवण्यात आले. काहींना एका विषयात तर काहींना चार-चार विषयात शून्यू ग्रेड दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे याच विद्यार्थ्यांना त्याच विषयात पहिल्या सत्रात ए ग्रेड मिळाले आहे. या सर्व गोंधळानंतर निकालात बदल होऊ शकतो, पाच-दहा टक्के निकालच असं होऊ शकते असे मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले 'एबीपी माझा'शी बोलतांना म्हणाले. तसेच निकालात सुधरणा करण्याचा पर्याय असल्याचे कुलगुरू म्हणाले. 


विद्यापीठाने काढलं पत्र...


या सर्व गोंधळानंतर 10 ऑगस्ट रोजी विद्यापीठाने एक पत्र काढले आहे. ज्यात म्हटले आहे की, बी.एस्सी. प्रथम, द्वितीय, तृतिय वर्ष (सत्र पध्दत) मार्च एप्रिल 2022  च्या जुन-जुलै 2022  मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल 6 ऑगस्ट रोजी घोषीत झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणी (exam paper rechecking) व उत्तरपत्रिकेच्या छायांकीत प्रतिसाठी अर्ज करावयाचे आहेत त्यांनी तो दिलेल्या मुदतीत आपल्या महाविद्यालयात अर्ज सादर करावेत. त्यांनतर कोणत्याही परिस्थीतीत अर्ज स्विकारले जाणार नसल्याचं विद्यापीठाने म्हटले आहे. विद्यापीठाने याच पत्रात अर्ज करण्यासाठी शुल्क लागणार असल्याचा उल्लेख केला आहे.


मोठी बातमी: मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांच्या निकालात गोंधळ? शेकडो विद्यार्थ्यांना शून्य ग्रेड


अर्जासाठी लागणार एवढे शुल्क...


गुण पडताळणी



  • विद्यार्थ्यांने महाविद्यालयात अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 23 ऑगस्ट 2022  आहे.

  • यासाठी प्रती पेपर 50 रुपये शुल्क लागेल 

  • महाविद्यालयाने विद्यापीठास सादर करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2022  आहे.


उत्तरपत्रिकेची फोटो कॉपी



  • विद्यार्थ्यांने महाविद्यालयात अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 23 ऑगस्ट 2022  आहे.

  • यासाठी प्रती पेपर 100  रुपये शुल्क लागेल 

  • महाविद्यालयाने विद्यापीठास सादर करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2022  आहे.


उत्तरपत्रिकेचे पुर्नमुल्यांकन



  • विद्यार्थ्यांने महाविद्यालयात सादर करण्याचा अंतिम दिनांक: उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत प्राप्त झाल्यापासून 5 दिवसांत

  • यासाठी प्रती पेपर 200  रुपये शुल्क लागेल

  • महाविद्यालयाने विद्यापीठास सादर करण्याचा अंतिम दिनांक: उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत प्राप्त झाल्यापासून 8 दिवसांत

  • प्राप्त छायांकित प्रती पैकी फक्त दोन उत्तरपत्रिकेचे पुर्नमुल्यांकन करता येईल.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI