Aurangabad News: औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पारुंडी गावात डोक्यावर हात ठेवून उपचार करण्याचा दावा करणाऱ्या बाबाचा एबीपी माझाने भांडाफोड केल्यानंतर आता पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता खोटी आश्वासने देऊन गोरगरिबांची फसवणूक करणाऱ्या या बाबावर कारवाई होण्याची शक्यता आहे. 


औरंगाबादच्या पारुंडी गावात गेल्या दोन वर्षांपासून बाबासाहेब शिंदे नावाचा एक व्यक्ती स्वतःला येशुंचा भक्त सांगून, फक्त डोक्यावर हात फिरवून दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करतोय. त्याच्या याच दाव्यांना बळी पडून औरंगाबादसह बीड, जालना आणि इतर जिल्ह्यातील हजारो लोकं उपचारासाठी त्याच्या दरबारात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर यासर्व प्रकरणाचा एबीपी माझाने भांडाफोड केला आहे. त्यानंतर आता याप्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु झाली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कलवानिया यांनी दिली आहे. 


कोण आहे हा बाबा...


उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू राहणीमान असलेला बाबासाहेब शिंदे नावाचा हा व्यक्ती स्वतःला येशुंचा भक्त सांगतो. सोबतच येशुंच्या आशीर्वादानेच आरोग्य सेवा देत असल्याचा दावाही करतो. अंगात इस्त्रीचे कपडे,शर्टिंग करून येणारा हा बाबा लोकांवर छाप पाडण्याचा प्रयत्न करतो. ज्या रुग्णांवर डॉक्टरही उपचार करू शकले नाहीत,त्यांच्यावर आपण उपचार करून त्यांना बरे केल्याचा दावा हा डॉक्टर करतो. एवढच नाही तर शुगर, कॅन्सर सारख्या आजारांवर सुद्धा आपण उपचार केले असल्याचा दावा हा बाबा करतो. 


बाबावर कारवाईची 'अनिस'कडून मागणी 


पारुंडी गावात सुरू असलेल्या बाबासाहेब शिंदे नावाच्या बाबाच्या दरबारावर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. हा सर्व प्रकार धर्मप्रसारासाठी सुरु आहे. स्वतःचं काही लोकांना दरबारात उभे करून आपले आजार बरे झाल्याचे सांगून लोकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे यामागे काहीतरी षड्यंत्र सुद्धा असू,शकते. मात्र हा सर्व प्रकार अंधश्रद्धेचा भाग असल्याचं 'अनिस'चे राज्य सचिव शहाजी भोसले यांनी म्हंटले आहे. त्यामुळे या बाबावर त्वरित कारवाई करण्याची मागणी सुद्धा भोसले यांनी केली आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: डोक्यावर हात ठेवताचं कॅन्सर बरा होतो; काय आहे नेमकं प्रकरण?


Dahihandi 2022: दहीहंडी शेवटच्या टप्प्यात असताना दोन गट भिडले; चाकू काढत थेट...