Aurangabad News: भारतात (India) होणाऱ्या जी 20 परिषेदच्या (G-20) निमित्ताने फेब्रुवारी महिन्यात विविध देशातील पाहुणे औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान याचवेळी ते औरंगाबादमधील जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ (Ajanta-Ellora Caves) लेणीला देखील भेट देणार आहे. त्यामुळे अशावेळी औरंगाबाद ते अजिंठा रस्त्यावरील (Aurangabad to Ajantha Road) प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहे. मात्र हे काम संतगतीने सुरु असल्याने जिल्हा प्रशासन 'ऍक्शन मोड'मध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. तर औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याचे काम जानेवारी अखेर पूर्ण करा अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.
जिल्हाधिकारी पाण्डेय आणि पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी हर्सूल ते अजिंठा रस्त्याची गुरुवारी संयुक्त पाहणी केली. तहसीलदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांत समन्वय ठेवून रस्त्याचे काम पुर्ण करावे. या कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले. तर जळगाव टी पॉइंट ते अजिंठा लेणी पर्यंतच्या रस्त्याची कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.
G-20 च्याअनुषंगाने प्रशासन 'ऍक्शन मोड'मध्ये
फेब्रुवारी महिन्यातG-20 च्याअनुषंगाने जी 20 परिषेदचं एक शिष्टमंडळ औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहे. त्यामुळे या निमित्ताने शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम स्थानिक प्रशासनाकडून सुरु आहे. तसेच हे शिष्टमंडळ अजिंठा आणि वेरूळ लेणीला भेट देणार असल्याने हा रस्ता गुळगुळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याच्या काम संतगतीने सुरु आहे. त्यामुळे विदेशी पाहुण्यांसमोर रस्त्याची हीच बिकट अवस्था समोर येऊ नयेत म्हणून प्रशासन कामाला लागले आहेत. तर औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याचे काम जानेवारी अखेर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पर्यटकांसाठी आवश्यक सेवा सुविधा द्यावेत...
सोबतच पर्यटकांची संख्या पाहता अजिंठा लेणी परिसरात रुग्णवाहिका आणि डॉक्टराची नेमणूक करावी. एक खिडकी तिकीटाची निर्मिती तसेच वीजपुरवठा खंडित होवू नये म्हणून महावितरण आणि वन विभागाने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. लेणी परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, भारतीय पुरातत्व विभाग यांनी पर्यटकांसाठी आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.