Aurangabad News: जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक कामाच्या ठिकाणी राहत नसल्याचा मुद्दा भाजपचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यांच्या याच भुमिकेवरून आता शिक्षक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान एका शिक्षकाने बंब यांना फोनवरून त्यांच्या भुमिकेबद्दल प्रश्न उपस्थित करत खडेबोल सुनावले, या दोघांमध्ये चांगलीच वादावादी झाली. शिक्षक आणि बंब यांच्यातील संभाषणाची ऑडीओ क्लिप सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाची आणि बंब यांच्यातील फोनवरील संवादाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शिक्षकाने प्रशांत बंब यांना झापझाप झापले आहे. शिक्षण शेत्रातील त्रुटींवर बोट ठेवत या शिक्षकाने प्रशांत बंब यांचे अक्षरश: वाभाडे काढले. एक आमदार म्हणून तुम्हाला ला* वाटली पाहिजे, असे म्हणत या शिक्षकाने बंब यांचा पाणउतारा केला. बंब आणि शिक्षक यांच्यातील ही ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बंब यांनी शिक्षकालाच फटकारले...
या संभाषणात शिक्षक बंब यांना बोलत असतांना बंब यांचा पारा चढला आणि त्यांनी त्या शिक्षकालाच फटकारले. शिक्षकांना ला* वाटत नाही का? असे बंब म्हणाले. मु**** काहीही बोलू नका, स्वताःची मुले खाजगी शाळेत शिकवता असेही बंब म्हणाले. त्यामुळे बंब आणि या शिक्षकाची ऑडीओ क्लिप सद्या चर्चेचा विषय बनला आहे.
व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लिपमधील संभाषण...
बंब: प्रशांत बंब साहेब बोलतायत का?
शिक्षक: तुमच भाषण आयकल मी विधानसभेत केलं ते..
बंब: जी सर..
शिक्षक: मला एक तुम्हाला विनंती करायची असून, तुमचा मुद्दा माझ्या बुद्धीला पटला नाही.
शिक्षक: फक्त शिक्षकच घरभाडे घेतात का?
बंब: आयका माझं, आयका माझं, आयका, मला प्रश्न विचारला न आता निट ऐका
बंब: विषय असा आहे, ज्यावेळी जो विषय असतो त्यावेळी, तो बोलतो काल ग्रामसेवक, एमो बोललो, कृषी सहाय्यक बोललो, बरोबर ना... काल शालेय शिक्षणाचा हाऊसमध्ये विषय होता त्या विषयावर तितकच बोलावं लागतं. मी काय बोलावं हे तुम्ही मला सांगू नका, माझी गोष्ट बरोबर आहे का चूक आहे हे सांगा आधी...
शिक्षक: बरं तुम्ही कन्नड तालुक्यातील आहात ना? तुमच्या कन्नडची जिल्हा परिषदेची शाळा पाहिली का? त्या ठिकाणी शौचालय नाही? शाळेवरचे पत्रे उडालेले आहेत. तुमचं तुमच्या भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेकडे लक्ष तरी आहे का? तुम्ही सरकारी शाळेच्या बाबत एवढं सांगता. तुमच्या भागातल्या शाळेत शौचालय नाही मूल उघड्यावर बसतात.
बंब: याची शिक्षक म्हणून तुम्हाला ला* नाही वाटत का?
शिक्षक: तुम्हाला आमदार म्हणून ला* वाटली पाहिजे थोडी..
बंब: आम्हाला मांडायला सभागृह आहे म्हणूनच म्हणलं...
शिक्षक: तुमच्या भागात रस्ते आहेत का? गटारी आहेत का? तुम्ही किती सुविधा लोकांसाठी दिल्यात..
बंब: तुम्ही दारू पिलेले आहात का.
शिक्षक: शिक्षक किती अडचणीमध्ये मुलांना शिकवतात हे तुम्हाला माहित आहे का?
बंब: अरे काय खोटे बोलता तुम्ही, जर तसे असताना तर स्वतःची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत ठेवली असती.
शिक्षक: तुम्ही मला शिकू नका माझी मुलगी जिल्हा परिषदेच्या शाळेतच आहे.
बंब: तुमच्या एकट्याची असले तर इतरांची आहेत का? बस झालं मु**** बोलू नका..
शिक्षक: बरं तुमची मुलं कुठल्या शाळेत आहेत. माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्ही एक आमदार आहात, तुमची मुलं कुठल्या शाळेत शिकतात...
बंब: तुमच्यामुळेच ना, तुम्ही नीट शिकवत नाहीत..
शिक्षक: आम्ही बरोबर शिकवतो, पण शासन काम करू देत नाही, शासन वेळोवेळी माहिती मागवतो.
बंब: नि****** स्वतःची मुलं, तुमची निर्लज्जता आहे. तुम्ही फोनवर असं बोलू शकता.
शिक्षक: तुम्ही लोक आम्हाला काम करू देत नाही, तुम्ही वेळोवेळी आम्हाला माहिती मागवता. ही माहिती द्या ती माहिती द्या..
बंब: तुम्ही तुमच्या एकट्या शाळेचे बोलू नका, 50 हजार पगार घेऊन खाजगी शाळेत दहा हजार पगारावर शिकवणाऱ्या शिक्षकांच्या शाळेत मुलं टाकता तुम्ही..
शिक्षक: आमचा पगार काढता, तुम्हाला किती निधी मिळतो..
बंब: आम्हाला तुमच्यावर लक्ष ठेवायला ठेवलंय, त्याचाच पगार मिळतो आम्हाला..
शिक्षक: माझं ऐका, माझं ऐकून घ्या, तुम्ही रिटायर झाले तरी 50 हजाराची पेन्शन घेता आम्ही एवढी सेवा करतो आम्हाला काय दिलं तुम्ही...
बंब: अहो तुम्ही लेखी द्या आणि समोर येऊन बोला तुम्ही मला, लेखी द्या आणि समक्ष भेटा तुम्ही मला बोलू शकत नाही....
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: भाजप आमदाराच्या संपत्तीच्या चौकशी अर्जाकडे दुर्लक्ष, औरंगाबाद खंडपीठाची थेट ईडीला नोटीस
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI