Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा रोहयो मंत्री संदिपान भुमरेंचे मावस भाऊ अंबादास नरवडे यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करत असतानाच त्यांच्या गाडीचा अपघात झाला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोन जन जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


नरवडे हे मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. दरम्यान त्यांची गाडी एका टेम्पोला जाऊन धडकल्याने  अपघात झाला. या अपघातात नरवडे यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या गाडीचा वेग अधिक असल्याने जोरोचा धडक दिल्याने मोठा आवाज झाला असल्याचे स्थनिक नागरिकांनी माहिती दिली. या अपघाताच्या घटनेनंतरपाचोड गावात आणि भुमरे यांच्या मतदारसंघात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. नरवडे हे भुमरे यांचे मावस भाऊ होते. सोबतच स्थनिक राजकारणात एक सक्रीय नेते म्हणून नरवडे यांची ओळख होती.