Aurangabad School News: दोन केंद्रीय मंत्री आणि तीन नेते राज्यात कॅबिनेट मंत्री असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याचा विकासात भर पडेल अशी अपेक्षा असतांना प्रत्यक्षात अंतर वेगळचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्यातील 833 शाळांचे थकलेले बिल भरण्यासाठी प्रशासनाकडे निधीच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कधी नव्हे एवढे मंत्रिपद मिळूनही जिल्ह्यातील शाळांची अशी परिस्थिती पाहायला मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 


औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा अंधारात असल्याचा मुद्दा मागील सरकारच्या काळात मोठ्याप्रमाणावर गाजला होता. त्यानंतर तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 14 कोटींचा भरणा करून शाळेतील अंधार दूर करण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात औरंगाबादमधील 2 हजार 31 शाळांपैकी 833 शाळा अजूनही अंधारातच आहे. विशेष म्हणजे थकलेले बिल भरण्यासाठी प्रशासनाकडे निधीच नसल्याचे सुद्धा समोर आले आहे. 


पाच मंत्री असलेला जिल्हा...


ज्या औरंगाबाद जिल्ह्यातील 833 शाळा अंधारात आहेत, त्या जिल्हाला थोडे थोडके नव्हे तर पाच मंत्री लाभले आहेत. ज्यात केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यातील कॅबिनेट मंत्री असलेले संदिपान भुमरे,अब्दुल सत्तार आणि अतुल सावे यांचा समावेश आहे. सोबतच विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे सुद्धा औरंगाबाद जिल्ह्यातील आहे. औरंगाबाद जिल्ह्याला एवढ काही लाभलं असतांना जिल्ह्यातील शाळा अंधारात असल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. 


ग्रामीण भागातील अडचणी...


औरंगाबाद जिल्ह्यातील अंधारात असलेल्या शाळांमध्ये बहुतांश शाळा ग्रामीण भागातील आहे. त्यामुळे वीज नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून, याचे परिणाम त्यांच्या शिक्षणावर होत आहे. काही ठिकाणी कंप्युटर असूनही मुलांना वापरता येत नाही. तर काही शाळेत प्रोजेक्टर वीज नसल्याने बंद पडली आहे. तर काही ठिकाणी शाळेतील वर्गात अंधार पडत असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासवर्गावर होतोय. 


सौरऊर्जेचा प्रयोग...


वीज न भरल्याने महावितरणकडून शाळेतील वीज कनेक्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता या शाळांमध्ये सौरर्जेऊचा प्रयोग करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी याबाबत माहिती देतांना म्हंटले आहे की, ज्या शाळांची वीज कनेक्शन बंद करण्यात आले आहेत, तिथे सौरऊर्जेने वीजपुरवठा करण्याचा वनटाईम कॉस्ट अंतर्गत पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे अंधारात असलेल्या शाळांना दिलासा मिळू शकतो. 


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं वैजापूर महामार्गावर रास्ता रोको; वाहतूक ठप्प


Aurangabad: डोक्यावर हात ठेवताचं कॅन्सर बरा होतो; काय आहे नेमकं प्रकरण?


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI