Gram Panchayat Election: राज्यात सात हजार पेक्षा अधिक मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) देखील एकूण 216 ठिकाणी निवडणूक (Election) पार पडणार आहे. मात्र मतदान होण्यापूर्वी 14  सरपंचांची बिनविरोध निवड झाली असून, 308 सदस्यांचीही लॉटरी लागली आहे. तर उरलेल्या जागांसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. 

जिल्ह्यात मुदत संपलेल्या 216 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत थेट सरपंचपदासाठी 1092,तर सदस्यपदासाठी 5481 अशा 6573 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांपैकी 371 जणांचे अर्ज छाननीत बाद ठरले. तर 1900 जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने सध्या सरपंचपदासाठी 611 तर सदस्यासाठी 3626 असे 4237 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. दरम्यान, यात थेट सरपंचपदी 14 तर सदस्यपदी 308 उमेदवारांच्या विरोधात एकही उमेदवार रिंगणात शिल्लक नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीची आकडेवारी 

तालुका  सरपंच पदाचे उमेदवार  सदस्य पदाचे उमेदवार  बिनविरोध सरपंच  बिनविरोध सदस्य 
औरंगाबाद  100 577 02 61
पैठण  60 472 00 09
फुलंब्री  49 321 03 21
सिल्लोड  54 352 00 15
सोयगाव  11 26 01 26
कन्नड  140 833 03 63
खुलताबाद  29 200 01 12
वैजापूर  79 382 01 46
गंगापूर  89  463 03 55
एकूण  611 3626 14 308

राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

ग्रामीण भागात सद्या निवडणूकीचा उत्साहा पाहायला मिळत आहे. इच्छुकांकडून प्रचार सुरु आहे. तर निवडणुकीत आपलाच विजय होणार असे दावे केले जात आहे. सद्या गावातील पारावर सद्या फक्त निवडणुकीच्याच चर्चा रंगताना पाहायाला मिळत आहे. तर अनेक ग्रामपंचायतसाठी राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे.  

Aurangabad : मॉल्सच्या पार्किंगमध्ये दुचाकी 'पार्क' करत असाल तर काळजी घ्या, बसू शकतो मोठा फटका