Aurangabad University Exams: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षांचा गोंधळ पाहायला मिळाला होता. ऐनवेळी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या शेकडोंनी वाढल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला आल्यामुळे एका बेंचवर तीन-तीन विद्यार्थी बसविण्याची वेळ परीक्षा केंद्र संचालकांवर आली. त्यांनतर घडलेल्या या सर्व प्रकरणाची दखल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेत, चौकशीचे आदेश दिले  होते. त्यानुसार विद्यापीठाने शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना अहवाल पाठवला आहे. तर हा अहवाल 'एबीपी माझा'च्या हाती लागला असून, अहवालात विद्यापीठाने परीक्षेच्या सावळ्या गोंधळाला माध्यमं जबाबदार असल्याचा जावईशोध लावला आहे. विशेष म्हणजे या सर्व गोंधळाचे मुख्य कारण अहवालाच्या सर्वात शेवटी देण्यात आले आहे. 


 विद्यापीठाचा जावईशोध


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, गोंधळ झालेल्या परीक्षा केंद्रावर विविध संघटनांचे पदाधिकारी व मिडीया प्रतिनिधींनी परीक्षा केंद्रात अवैधरित्या प्रवेश करुन परीक्षार्थींचे लक्ष विचलित केले. तसेच महाविद्यालय व्यवस्थापनाला अतिरिक्त विद्यार्थीसंख्येसाठी बैठक व्यवस्था करण्यासाठी पुरेसा कालावधी दिला नाही. त्यामुळे गोंधळ निर्माण झाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केली असता, विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ निर्माण होवून परीक्षेबाबतच्या अनिश्चित परिस्थितीमुळे सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी गर्दी करून पालक, मिडिया व इतर पत्रकार व संघटना यांना दूरध्वनीवरून संपर्क केला. त्यांनतर प्रकरण इलेक्ट्रॉनिक माध्यमातून चुकीच्या पध्दतीने प्रसिध्द करण्यात आल्याचा अहवालात म्हटले आहे. 


मुख्य कारण अहवालाच्या सर्वात शेवटी... 


माध्यमांवर गोंधळाची ठपका ठेवणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाने गोंधळाचे खरं कारण सर्वात शेवटी नमूद केले आहे. ज्यात म्हटल आहे की, के. पंढरीनाथ पाटील संगणकशास्त्र महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, येथे मूल्यांकन केंद्र सुरु असल्यामुळे सदरील केंद्रावरील 480 अतिरिक्त विद्यार्थी विजेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयाकडे वर्ग करण्यात आल्यामुळे सदरील परिस्थिती घडून आल्याचे निदर्शनास येत आहे. सदर परीक्षा केंद्रास अतिरिक्त विद्यार्थी संख्या देतांना एम.के.सी.एल. कडून समरीशिट जनरेट करतांना तांत्रिक चुकांमुळे मिळालेली संख्या व प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची यादी यामध्ये तफावत आढळून आली असल्याच म्हटल आहे. 


Aurangabad: मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षांचा गोंध; एका बेंचवर तीन-तीन विद्यार्थी


तसेच, कुलगुरूंनी आणि परीक्षा विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रास भेट दिल्यानंतर सदरील परीक्षा केंद्रावर झालेल्या गोंधळाची परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली असता, महाविद्यालयाकडे प्रत्यक्ष दिलेली विद्यार्थी संख्या व उपस्थित झालेली विद्यार्थी संख्या यात तफावत आढळून आली. महाविद्यालयाला अतिरिक्त विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यास पुरेसा अवधी मिळाला नसल्यामुळे एकाच बाकावर दोन विद्यार्थी किंवा काही ठिकाणी तीन विद्यार्थी परीक्षा देत असतांना निदर्शनास आल्याच सुद्धा अहवालात म्हटले आहे. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI