Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्यातील (aurangabad district) कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा टास्क फोर्सची बैठक पार पडली. यावेळी बाह्यरुग्ण, आंतररुग्ण विभागातील रूग्णांपैकी निवडक रुग्णांची RTPCR करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या. सोबतच लसीकरणावर भर देण्याच्याबाबत सुद्धा काही सूचना केल्या.


यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. लसीकरणामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढून संक्रमणाला अटकाव होतो. त्यामुळे लसीकरणासह जिल्ह्यात कोविड चाचण्या करण्यावर भर देण्याची गरज असल्याच जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले. तर जिल्ह्यातील सर्व रुग्णालयातील बाह्यरुग्ण (OPD) विभाग, आंतररुग्ण (IPD) विभागात भरती होणाऱ्या रूग्णांपैकी निवडक रुग्णांची RTPCR चाचणी करावी. ही चाचणी संबंधित डॉक्टरांच्या सल्यानुसार करण्यात यावी. तसेच ज्या भागात लसीकरण कमी झालेले आहे त्या भागातील लसीकरण वाढण्यासाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा असेही जिल्हाधिकारी म्हणाले.


रुग्णांची संख्या वाढली...


औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळत असून,रविवारी जिल्ह्यात तब्बल 53 नवीन रुग्ण आढळून आले. ज्यात 41 रुग्ण शहरातील तर तर 12 रुग्ण ग्रामीण भागातील होते. तिसरी लाट ओसरल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्याप्रमाणात रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून,आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे.


डॉक्टरांकडून काळजी घेण्याचे आवाहन ...


शहरातील वाढती रुग्ण संख्या पाहता डॉक्टरांकडून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मास्क घालणे बंधनकारक नसले तरीही सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरले पाहिजे. तसेच सोशल डिस्टेंसिंग ठेवलं पाहिजे. तसेच घरात आल्यावर हात-पाय स्वच्छ धुतले पाहिजे,असेही डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.


Coronavirus : चिंता वाढली! देशात 16 हजार 135 नवे कोरोना रुग्ण, 24 रुग्णांचा मृत्यू


Aurangabad To Delhi: दिल्लीसाठी सकाळच्या सत्रात इंडिगोची विमानसेवा सुरु; प्रवाशांचा वेळ वाचणार