Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) किराडपुरा भागात धक्कादायक घटना समोर आली असून, वाढदिवसाच्या कार्यक्रमात (Birthday Celebration) धक्का लागल्याच्या वादातून एकाची हत्या (Murder) करण्यात आली आहे. पाच वर्षीय मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात नाचताना (Dance) धक्का लागल्याने मामाने आपल्याच भाच्याचा जीव घेतला आहे. सय्यद माजिद सय्यद पाशा (वय 35 वर्षे, रा.गल्ली क्र-6 किराडपुरा) असे मृत्य व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी जिन्सी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मजर पठाण, मुज्जू पठाण, अरबाज पठाण, जाकेर पठाण, सलमा पठाण (सर्व राहणार गल्ली क्र-6 मक्कामस्जिद जवळ किराडपुरा औरंगाबाद) अशी आरोपींचे नावं आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्ती आणि आरोपी जवळचे नातेवाईक आहेत. दरम्यान शुक्रवारी रात्री जीन्सी भगातील किराडपुरा येथील बदामगल्लीत नात्यातील पाच वर्षीय चिमुकल्याचा वाढदिवस होता. त्यासाठी सर्वच नातेवाईकांना आमंत्रण देण्यात आल्याने अनेकजण या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. वाढदिवसाचा केक कापल्यावर डान्स सुरु झाला. यावेळी पाहुण्यांनी देखील डान्स करण्याचा आनंद घेतला. मात्र याचवेळी नाचताना मजीदचा धक्का आरोपीला लागला. धक्का लागल्याच्या कारणावरून दोघांमध्ये सुरवातीला वादविवाद सुरु झाला आणि पाहता-पाहता हाणामारी सुरु झाली. तर उपस्थित इतर नातेवाईकांनी मध्यस्थी करून त्यावेळी भांडण सोडवले.
पुन्हा हल्ला चढवला...
वाढदिवसाच्या कार्यक्रमात नाचताना झालेला वाद नातेवाईकांनी सोडवला. मात्र पुन्हा काही वेळेत आरोपीकडील लोकं हातात तलवार चाकू घेऊन पुन्हा आले. तर मृत माजीद आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर जोरदार हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यात माजीद ,सय्यद जावेद, सय्यद वाजेद, सय्यद अजीज हे रक्ताच्या थरोळ्यात जमिनीवर पडले. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.
आणखी एकाची चिंता चिंताजनक!
माजीद आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केल्यावर आरोपी तेथून निघून गेली. त्यानंतर उपस्थित नातेवाईकांनी पोलिसांना याबाबत माहिती कळवली. घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यातील सय्यद माजिद सय्यद पाशा याला तपासून डॉक्टरांनी मयत घोषीत केले. तर आणखी तिघांवर उपचार सुरु असून, एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांना दिली आहे. दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यता घेतले असून, इतर आरोपींचा शोध घेत आहे.
Aurangabad: इंजिनीयर तरुणाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून मागीतीली दहा लाखांची खंडणी, युवतीसह पाच जण गजाआड