Aurangabad Crime News: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) औरंगाबाद  (Aurangabad) पथकाने मोठी कारवाई करत बनावट दारू विक्री (Selling Fake Liquor)  करणाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत तब्बल 13 लाख रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही बनावट दारू ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Elections)  विक्रीसाठी तयार करण्यात आली होती असेही तपासात समोर आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एवढ्या मोठ्याप्रमाणात बनावट दारू बनवली जात असल्याचे घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी भाऊलाल देवचंद जन्हाडे उर्फ चिंग्या (वय-34 वर्षे, रा. नांदी ता. अंबड जि.जालना),  गणेश देवचंद जन्हाडे (वय 30 वर्षे, रा. नांदी ता. अंबड जि.जालना) ₹, गोकुळ अंबरसिंग बमनावत वय 35 वर्षे रा. रामवाडी ता.जि. औरंगाबाद), ताराचंद रुपचंद चरखंडे (वय-32 वर्षे रा. कौचलवाडी ता. अंबड जि.जालना) यांना अटक करण्यात आली असून, राम राजपुत उर्फ रामधन सुपडसिंग घुसिंगे अदयाप फरार आहे. 


राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शुल्क विभागाच्या भरारी पथकास 18 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुक निमित्त कोरडा दिवस जाहीर असल्याने अवैधरित्या बनावट देशी दारुची वाहतूक व पुरवठा होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पथकाने औरंगाबाद केंब्रीज स्कुल ते सावंगी बायपास रोडवरील पिसादेवी शिवारातील हॉटेल स्वराज येथे रात्री एक वाजेच्या सुमारास सापळा लावला. यावेळी एक व्यक्ती दुचाकीवर पाच भरलेल्या गोणीसह उभा असलेला दिसुन आला. त्यामुळे तपासणी करण्यासाठी त्याला थांबण्याचा इशारा करताच तो पळून गेला. तर शुल्क विभागाच्या पथकाने त्याने सोडून गेलेल्या गोण्याची तपासणी केली असता, त्यात बनावट देशी दारुच्या 720 आशा एकूण 1 लाख 30  हजार 500 रुपयांचा मुददेमाल मिळुन आला. फरार झालेल्या आरोपीचे नाव राम राजपुत उर्फ रामधन सुपडसिंग घुसिंगे असून तो अदयाप फरार आहे. 


एकूण 13 लाखांची बनावट दारू जप्त...


राम राजपुत हा बनावट दारू सोडून पळून गेल्यावर या गुन्हयाच्या अनुशंगाने तपास चालू असतांना, ही बनावट दारू जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील किनगाव चौफुली येथील हॉटेल मातोश्री येथून आणल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शुल्क विभागाच्या पथकाने आरोपीच्या राहत्या घरासह किनगाव चौफुलीवरील हॉटेल मातोश्री आणि किनगाव शिवार व मढपिंपळगाव येथील हॉटेल सातबारा येथे छापा मारला. यावेळी तब्बल 11 लाख 94 हजार 270 रुपयांची बनावट दारू मिळून आली. त्यामुळे या संपूर्ण कारवाईत आत्तापर्यंत 13 लाख 24 हजार 770 रुपयांची बनावट दारू मिळून आली आहे. ज्यात आतापर्यंत भाऊलाल जन्हाडे उर्फ चिंग्या, गणेश जन्हाडे, गोकुळ बमनावत, ताराचंद चरखंडे यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलमाखाली गुन्हा दाखल करून, अटक करण्यात आली आहे. तर राम राजपुत उर्फ रामधन सुपडसिंग घुसिंगे  अदयाप फरार आहे. 


ग्रामपंचायत निवडणुकीत बनावट दारू विक्री!


शुल्क विभागाने केलेल्या कारवाईतील बनावट दारू ग्रामपंचायत निवडणुकीत अवैधरीत्या विकण्यासाठी तयार करण्यात आली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र 18  तारखेलाच शुल्क विभागाने 1 लाख 30 हजारांची दारू पकडल्याने, वरील आरोपींचा कार्यक्रम फसला. तर या कारवाईनंतर वरील आरोपींनी उरेलेली बनावट दारू वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवली. मात्र उत्पादन शुल्क विभागाने तपासाची चक्रे फिरवत सर्व एकूण 13 लाखांची बनावट दारू ताब्यात घेतली आहे. 


थरार! तुफान वेग अन् चित्रपटातील दृश्यांप्रमाणे कारच्या कोलांट्या; 'समृद्धी'वरील अपघाताची मालिका सुरूच