Aurangabad Honey Trap: एका तरुण अभियंत्याला (Engineer) प्रेमाच्या (Love) जाळ्यात ओढून शरीर संबंध ठेवत, नंतर बलात्काराचा गुन्हा (Rape Case) दाखल करण्याची धमकी देऊन दहा लाखाची खंडणी उकळणाऱ्या महिलेसह त्याच्या जोडीदाराच्या विरोधात औरंगाबाद शहर पोलिसात (Aurangabad City Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पंडित जाधव, प्रतिक सुधीर जाधव, नकीब नसीर पटेल, अक्षय (पुर्ण नाव माहित नाही) यासह एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सातारा परिसरात राहणाऱ्या एक 27 वर्षाच्या इंजिनियर तरुणाची आरोपी महिलेसोबत ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. हा तरुण त्या महिलेच्या प्रेमात एवढा गुंग झाला की, त्याच्यावर लावलेला हा हनीट्रॅप (Honey Trap) आहे याची त्याला थोडीही जाणीव झाली नाही. विशेष म्हणजे दोघांमध्ये शरीरसंबध देखील झाले. मात्र अचानक पुढे या तरुणाकडे महिलेने आपल्या साथीदारांच्या मदतीने पैश्यांची मागणी सुरु केली. एवढंच नाही तर मारहाण देखील केली. पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील दिली. 


असा रचला डाव... 


दरम्यान 19 डिसेंबर रोजी महिलेचा साथीदार संजय जाधव व प्रतिक जाधव यांनी फोन करून तुमच्या ऑफीसचे पार्सल आले असल्याचे तरुणाला सांगितले. तसेच त्यासाठी रेल्वे स्टेशन येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयाजवळ येण्यास सांगितले. तिथे गेल्यावर संजय जाधव याने आपण PI  प्रदिप घुगे (मुंबई क्राईम ब्रांच)  असल्याची बतावणी करुन तरुणाला बीएमडब्ल्यु कारमध्ये (MH 22 U 7777) जबरदस्तीने बसवून हॉटेल पाटीलवाडा येथे नेले.  तेथे नेल्यावर तुमच्याविरुद्ध एका महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला असल्याची भिती दाखवून तरुणाला मारहाण केली. तसेच त्याचा विवस्त्र व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी दिली.  त्यामुळे घाबरलेल्या तरुणाने सातारा पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी महिलेसह तिच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या. 


दहा लाखांची मागणी... 


महिलेच्या साथीदारांनी पीडीत तरुणाला हॉटेलमध्ये घेऊन गेल्यावर त्याच्याकडून 40  हजार काढून घेतले. तसेच हॉटेल पाटीलवाडा येथे जेवणाचे 950  रुपयांचे बिल आणि वाईन शॉपवर घेतलेल्या दारूचे 720 रुपये असे एकूण 41 हजार 970 रूपये घेतले. तसेच आरोपी महिलेसोबतचे प्रकरण मिटवण्यासाठी दहा लाख रूपयाची मागणी केली. तर त्यापैकी पाच लाख रुपये दे असे म्हणत तरुणाची बुलेट जबरदस्तीने घेवून गेले. पाच लाख रूपये आणून दे आणि बुलेट घेवून जा असे म्हणून खंडणी मागीतली असल्याचं तरुणाने आपल्या जबाबात म्हटले आहे. 


Aurangabad: तारीख ठरली, पण साखरपुड्याच्या आठवडाभरापूर्वीच तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या