Aurangabad Crime News: औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाडळी एका 40 वर्षीय व्यक्तीची हत्या (Murder) करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने थेट कुऱ्हाडीने शीर धडावेगळे केल्याचे समोर आले आहे. मयत व्यक्ती हा गावात सतत गुंडगिरी करून, लोकांना शिवीगाळ करायचा. दरम्यान आरोपीला देखील अशीच शिवीगाळ केल्याने त्याने रागाच्या भरात कुऱ्हाडीने हल्ला करत शीर धडावेगळे केलं.  संदीप संपत गायकवाड (वय 40 वर्षे, रा. पाडळी ता. पैठण) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. अजय उर्फ अजिनाथ साईनाथ गायकवाड ( रा. पाडळी ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडळी येथील संदीप संपत गायकवाड याचा शीर नसलेला मृतदेह शुक्रवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास गावातील माधव शेरे यांच्या गायरान शेताच्या रोडकडील बांधाजवळ पडलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यामुळे गावकऱ्यांनी याची माहिती तत्काळ बिडकीन पोलिसांना दिली. माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे साहायक पोलीस निरीक्षक संतोष माने आपली पथकासह घटनास्थळी पोहचले. तसेच याबाबत वरिष्ठांना माहिती देत, ठसे तज्ज्ञ, श्वान पथकास पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळचा पंचनामा केला. मात्र याचवेळी मृतदेहाचा शीर घटनास्थळी नसल्याने त्याचा शोध घेण्यात आला. शुक्रवारी दिवसभर शोधूनही पोलिसांना मयताचे शीर सापडले नाही. दरम्यान आज सकाळी पोलिसांना परिसरात मयताचे शीर सापडले आहे. 


शिवीगाळ केल्याने केली हत्या! 


मयत संदीप गायकवाड हा गावात गुंडगिरी करायचा. दारूच्या नशेत अनेकांना शिवीगाळ करायच्या. त्याच्यावर बिडकीन पोलिसांत अनेक गुन्हे दाखल होते. दरम्यान 19 जानेवारीला आरोपी अजय गायकवाड आणि मयत संदीप गायकवाड सोबत होते. नेहमीप्रमाणे संदीप याने त्यादिवशी दादागिरी करत अजयला शिवीगाळ केली. त्यामुळे याचा अजयला प्रचंड राग आला होता. त्यामुळे त्याने संदीपला संपवण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला अजयने संदीपला दारू पाजली आणि त्यानंतर कुऱ्हाडीने त्याच्यावर हल्ला करत त्याचा जीव घेतला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने कुऱ्हाडीने संदीपच्या मृतदेहाचं शीर धडावेगळ केले.  


पोलिसांनी ठोकल्या बेड्या! 


पाडळी गावात शीर धडावेगळे केलेलं मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आधी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर हत्येचे दिवशी त्याच्यासोबत अजय गायकवाड दिवसभर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी अजयला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिली. संदीपने शिवीगाळ केला असल्याने रागाच्या भरात त्याची हत्या केली असल्याची कबुली देखील त्याने दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad News: शिवीगाळ करणारा मित्र डोक्यात बसला, म्हणून धारदार दगडाने मुंडके धडावेगळे करत त्याचा जीवच घेतला