Maharashtra Grampanchayat Election Updates: राज्यभरात (Maharashtra News) ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी (Grampanchayat Election) इच्छुकांची लगबग सुरू असतानाच, निवडणूक आयोगाची वेबसाईट (Election Commission Website) चालत नसल्याने राज्यभरात गोंधळ उडाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांना रात्रभर जागून काढावी लागत आहे. विशेष म्हणजे, अर्ज भरण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांची धडपड पाहायला मिळत आहे. 


औरंगाबादमधील (Aurangabad News) अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरताना वेबसाईट चालत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बिडकीन गावात गेल्या दोन दिवसांपासून 50 पेक्षा अधिक उमेदवार आपला अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन केंद्रात रात्र जागून काढत आहे. मात्र, असं असताना उमेदवारांना दोन दोन दिवस अर्ज भरण्यासाठी लागत आहे.



अर्ज भरण्यासाठी 30 तासांचा कालवधी...


राज्यात सध्या 7 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याठी उद्यापर्यंत वेळ आहे. मात्र सध्या अर्ज भरताना 'पंचायत महाराष्ट्र इलेक्शन महाराष्ट्र डॉट गव्हरमेंट डॉट इन' ही वेबसाईड हँग होत असल्यामुळे उमेदवारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. आता केवळ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 30 तास उरले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरायचे कसे? असा प्रश्न उमेदवारांसमोरं उभा राहिला आहे. एका ग्रामपंचायतीसाठी 40 ते 50 अर्ज असल्यामुळे अनेक उमेदवार सध्या अर्ज भरलू शकले नसल्याचं समोरं आलं आहे. 


इच्छुकांनी रात्र जागून काढली...


भावी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धरपड सुरु आहे. मात्र त्यातच आता सर्व्हर डाऊन झाल्याने निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नाही. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी इच्छुक अक्षरशः ऑनलाईन केंद्रावर नंबर लावून बसली आहेत. एवढचं नाहीतर नंबर लागत नसल्याने इच्छुकांनी अर्ज भरण्यासाठी रात्र  जागून काढली आहे. मात्र तरीही वेबसाईट चालत नसल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. 


ऑफलाईन अर्ज भरण्याची मागणी 


उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. मात्र सद्या वेबसाईट चालत नसल्याने अर्ज भरण्यासाठी अडचण येत आहे. त्यातच उद्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात यावे अशी मागणी इच्छुक उमेदवार यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक यावर आता काय तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


निवडणूक कार्यक्रम...


अर्ज दाखल करण्याची मुदत : 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 
अर्ज छाननी : 05 डिसेंबर
अर्ज मागं घेण्याची तारीख : 7 डिसेंबर 
मतदान : 18 डिसेंबर 
मतमोजणी आणि निकाल : 20 डिसेंबर