औरंगाबाद : कोविड काळात वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) प्रक्रीया ऑनलाईल झाली. याचाच फायदा घेण्यासाठी सायबर भामटे सज्ज झालेत. गुगलवर लायसन्स इन महाराष्ट्र सर्च केल्यानंतर अनेक बोगस साईट्स उघडत आहेत. लायसन्ससाठी पैशांची मागणी करत आहे. त्यामुळं लायसन्स काढताना काळजी घ्या.


ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स काढताय सावधान
गुगलवर ड्रायव्हिंग लायसन्स इन महाराष्ट्र असा शब्द टाकल्यावर अशा भरमसाठ साईट्स उघडतात. त्यामुळं नक्की लायसन्ससाठी कुठल्या साईटवर जावे हाही प्रश्न पडतो. खरी वेबसाईट तर दिसतेच. मात्र, अनेक खोट्या वेबसाईटच्या लिंकसुद्धा त्या ठिकाणी दिसतात. यातील एक बेवसाईट आम्ही चेक केली असता यावर तुमचं नाव आणि फक्त फोन नंबर मागितला जातो, ते टाकलं कि थेट पैशांची मागणी. तुम्हाला कसलं लायसन्स हवंय. तुम्ही कुठल्या शहरात राहता याची कुठलीही माहिती मागितली जात नाही. असंच आरटीओ ऑफिस नावानंही एक साईट चालते. तिथंही तसाच प्रकार आहे. फक्त पैशांची मागणी. सध्या ऑनलाईन पद्धतीने वाहन चालवण्याचा परवाना मिळत असल्यानं अशा माध्यमातून लोकांची लूट होतेय.


दरम्यान काही लोकांची फसवणूक झाल्याचं परिवहन अधिकारीसुद्धा मान्य करतात. अगदी त्यांनीसुद्धा यातील काही साईट्सवर डेमो करून पाहिला. तेव्हा त्यांनासुद्धा फसवणुकीचा अनुभव आला. त्यामुळं आता त्यांनी अधिकृत संकेसस्थळ तपासूनच वाहन परवाना घ्यावा आणि फसवणूक टाळा असे आवाहन केले आहे.


गोष्ट ऑनलाईनची आली की सायबर भामट्यांची टीम तुम्हावा लुटायला बसलीच असते. त्यामुळं कुठलाही व्यवहार करताना सावधगिरी ठेवावी लागतेय. त्यामुळं वाहनाचा परवाना काढताना सुद्धा आता तुम्हाला अधिकृत संकेतस्थळ पाहूनच घ्यावे लागेल. अन्यथा तुमचे पैसैही जातील आणि तुमची बरीच खाजगी माहितीसुद्धा सायबर भामट्यांच्या हातात जाण्याची भिती आहेच.