औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबादमधून एका डॉक्टरला एटीएसने ताब्यात घेतलं आहे. मुंब्रा आणि औरंगाबादमधून पकडलेल्या नऊ संशयित दशतवाद्यांच्या संपर्कात असल्याच्या कारणावरुन डॉक्टरवर कारवाई करण्यात आली. या नऊ संशयितांनी काश्मीरमधील दहशतवाद्यांना पुरवला होता. त्यामध्ये संबंधित डॉक्टरचा समावेश असल्याचा संशय एटीएसला आहे.
अन्न आणि पाण्यात विष कालवून घातपात करण्याच्या संशयावरुन महाराष्ट्र एटीएसने जानेवारी महिन्यात आयसिस या दहशतवादी संघटनेच्या नऊ संशयितांना ताब्यात घेतलं होतं. ताब्यात घेतलेला डॉक्टर संपर्कात होता. एटीएसने तीन दिवस त्याची कसून चौकशी केली. मात्र या डॉक्टरचं नाव मात्र समजू शकलेलं नाही.
एटीएसने मुंब्रामधून मझहर शेख, जम्मन खुठेऊपाड, सलमान खान, फरहाद अन्सारी यांच्यासह एका अल्पवयीन तरुणाला अटक केली होती. तर औरंगाबादमधील छाप्यांमध्ये मोहम्मद मोहसीन सिराजउल्लाह खान, मोहम्मद तकीउल्लाह सिराज खान, काजी सर्फराज आणि मुशाहेदूल इस्लाम उर्फ तारेख यांना पकडलं होतं.
या नऊ संशयितांकडे स्फोटकांऐवजी या संशयितांकडे हायड्रोजन पॅरॉक्साईड, विषारी पावडर, आणि अॅसिड सापडलं होतं. राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम, उच्चभ्रूंचे लग्नसोहळ्यांसह गर्दी जमवणारे कार्यक्रम त्यांचं लक्ष्य होतं.
संशयित दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचा अंदाज, औरंगाबादमधील डॉक्टर एटीएसच्या ताब्यात
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
05 Mar 2019 08:05 AM (IST)
अन्न आणि पाण्यात विष कालवून घातपात करण्याच्या संशयावरुन महाराष्ट्र एटीएसने जानेवारी महिन्यात आयसिस या दहशतवादी संघटनेच्या नऊ संशयितांना ताब्यात घेतलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -