गतीमंद मुलांच्या स्कूल बसमध्ये घुसून एका अल्पवयीन गतिमंद मुलीची छेड काढून विनयभंगाची घटना औरंगाबाद येथे घडल्याचे समोर आले आहे. या प्रकारात स्कूलबसचा चालकच सहभागी असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या टोळीकडून मागील अनेक दिवसांपासून असे प्रकार सर्रास सुरू असल्याचे देखील वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून 18 जानेवारीला समोर आले आहे. विनयभंग करुन ते नराधम शांत न बसता या प्रकाराचे चित्रीकरण करून ते व्हायरलही करीत होते. काही दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. विशेष म्हणजे यात स्कूलबसचा चालकही त्यांना मदत करीत होता. व्हीडीओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.
औरंगाबादमध्ये टोळक्याकडून गतीमंद मुलीचा विनयभंग आणि मारहाण, व्हिडिओ व्हायरल
चालकच करायचा मदत -
औरंगाबाद परिसरात गेल्या वीस वर्षांपासून गतीमंद मुलांची शाळा चालवण्यात येते. या शाळेत मुलीच्या पालकांनी मुलींना शाळेत जाण्यासाठी एक खासगी बस लावली होती. शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर मुली घरी परतण्यासाठी निघालेल्या या स्कूल बसच्या चालकाने रस्त्यात बस थांबवली. यावेळी दोन तरुण बसमध्ये घुसले. या बसमध्ये घुसून या टवाळखोरांनी निर्लज्जपणे एका अल्पवीय गतीमंद मुलीची छेड काढून विनयभंग केला. मुलगी किंचाळत होती रडत होती. मात्र हे टवाळखोर त्या मुलीचा व्हीडीओ काढण्यामध्ये दंग होते. हे नराधम हे एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी या व्हीडीओचा व्हाट्सअप स्टेटस ठेवला. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे स्कूलबसच्या चालकाच्या उपस्थितीतच हा अश्लाघ्य प्रकार सुरू होता. याप्रकरणी शहरातील सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चालकास अटक केली असून त्याला पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर, दोन आरोपी अल्पवयीन असल्याचा दावा केल्याने त्यांना सुधारगृहात पाठवण्यात येण्याची शक्यता आहे.
VIDEO | गतीमंद तरुणीवर नातेवाईकांकडून सामूहिक अत्याचार | स्पेशल रिपोर्ट | नागपूर | एबीपी माझा