औरंगाबाद : औरंगाबादमधून अतिशय संतापजनक घटना घडली आहे. स्कूल व्हॅनमधील अल्पवयीन गतिमंद मुलीचा तिघा नराधम तरुणांनी विनयभंग केल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे. औरंगाबादेत स्कूल व्हॅनमध्ये एका अल्पवयीन आणि गतीमंद मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपींमध्ये व्हॅन चालकाचाही समावेश आहे.


औरंगाबाद परिसरात गतीमंद मुला-मुलींसाठी शाळा आहे. या शाळेत मुलींना शाळेत जाण्यासाठी पालकांनी एक खासगी व्हॅन लावली होती. शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर स्कूल व्हॅनमधून मुली घरी निघाल्या असता चालकाने व्हॅन रस्त्यात बस थांबवली. त्यावेळी दोन टवाळखोर तरुण या व्हॅनमध्ये बसले. त्यावेळी स्कूल व्हॅन चालकासह या तिघांनी गतिमंद अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन करत तिचा विनयभंग केला.

स्कूलबसमध्ये शिरत तिघांकडून गतिमंद मुलीचा विनयभंग, औरंगाबादमधील संतापजनक घटना | ABP Majha



मुलगी किंचाळत होती रडत होती. मात्र हे टवाळखोर त्या मुलीचा व्हिडिओ काढण्यामध्ये दंग होते. हे नराधम हे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या व्हिडिओचे व्हाट्सअप स्टेटस ठेवले. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. याप्रकरणी शहरातील सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चालकास अटक केली आहे. त्यानंतर उशीरा अन्य दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. संस्थाचालकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी सातारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली.

संबंधित बातम्या :

फक्त कलाकारांनीच भूमिका का घ्यायची, सामान्य माणसांनीही भूमिका घ्यावी : अतुल कुलकर्णी

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नात्याबद्दल संजय राऊत म्हणाले...