Bhiwandi : भिवंडीतील पॉलीकॅब (Polycab) वायरच्या गोदामावर दरोडा टाकत वायर इलेक्ट्रिक वायर लंपास करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 9 चोरट्यांना ताब्यात घेतलय. नारपोली पोलीस  (Police Station) ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चोरट्यांनी कामगारांना शस्त्रांचा धाक दाखवून मारहाण केली आहे. चोरीचा प्रयत्न करणाऱ्या 13 चोरट्यांपैकी 9 जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलय. 


याबाबत अधिकची माहिती अशी की, भिवंडीतील (Bhiwandi) पॉलीकॅब वायरच्या गोदामात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वायरचा (Electric Wire) साठा आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शिडी लावून गोदामात घुसण्याचा प्रयत्न केला. यातील अनेक चोरट्यांनी गोदामाच्या परिसरात प्रवेश केला. यानंतर या चोरट्यांनी कामगारांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवून बांधून ठेवत त्यांच्याजवळील सोन्याची साखळी, मोबाईलसह इतर मुद्देमाल लंपास केला.


दोन आरोपींची कसून चौकशी करत इतर 7 जणही पोलिसांच्या ताब्यात 


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सुरुवातील टोळीतील इशान अब्दुल रहेमान शेख, शहबाज मोहम्मद सलीम शेख या दोघांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, दोघांची कसून चौकशी करताच त्यांनी इतर सहकाऱ्यांची नावे सांगितली. यानंतर पोलिसांनी इतर 7 जणांनाही ताब्यात घेतले आहे. अहमद हुसेन सत्तार सावत उर्फ सलीम,वजीर मोहम्मद हुसेन सावत उर्फ कान्या,रेहान कब्बन सैय्यद, गुलामअली लालमोहम्मद खान, हसन मेहंदी शेख, सलीम फत्तेमोहम्मद अन्सारी उर्फ सलीम हाकला, प्रमोदकुमार बन्सबहादुर सिंग या 7 जणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले आहे.


अटक करण्यात आलेले आरोपी सराईत चोरटे


पॉलीकॅब वायरच्या चोरीप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले आरोपी सराईत चोरटे (History Sheeter) आहेत. या 9 जणांविरोधात मुंबई (Mumbai), वसई, रायगड, पुणे (Pune) या भागांत 14 ठिकाणी गुन्हे नोंद आहेत. यापूर्वीही यांचा अनेक दरोड्यांमध्ये सहभाग आहे. शिवाय, यातील तिघांविरोधात पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच गुन्हे तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे व पोलिस पथकाने तपासाला सुरुवात केली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या 


काय सांगता! तब्बल 19 लाखांची दारू खड्ड्यात ओतली, पाहा फोटो


एकदम फिल्मी! पैशासाठी तरुणाचे सिंधुदुर्गत अपहरण, पोलिसांनी रिक्षाच्या मागे लिहलेल्या नावावरून लावला छडा


Ram Mandir : राम मंदिराचे डिझायनर आहेत तरी कोण, रचना कोणत्या शैलीत करण्यात आली? मॉडेल कसे तयार झाले??