काय सांगता! तब्बल 19 लाखांची दारू खड्ड्यात ओतली, पाहा फोटो

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तब्बल 19 लाखांची दारू खड्ड्यात ओतून दिली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News

1/8
विनापरवाना विक्रीसाठी बाजारात आलेला 19 लाख 58 हजारांचा देशी दारूचा साठा मागील आठवड्यात छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पकडला होता.
2/8
एमआयडीसी वाळूज भागात अतुल रमेश चक आणि संजय कवडे यांच्या मालकीच्या गोडाऊनमध्ये ही कारवाई करण्यात आली होती.
3/8
दरम्यान, आता हा 19 लाखांचा दारूसाठा छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडून नष्ट करण्यात येत आहे.
4/8
यासाठी दोन भलामोठे खड्डे करण्यात आले असून, त्यात बाटल्यामधील दारू ओतली जात आहे.
5/8
असे एकूण 588 बॉक्समधील दारूच्या बाटल्यातील दारू खड्ड्यात ओतून नष्ट केली जाणार आहे.
6/8
विशेष म्हणजे पोलिसांसह 25 पेक्षा अधिक कामगारांच्या मदतीने हा दारू साठा नष्ट केला जात आहे.
7/8
संपूर्ण 588 बॉक्समधील दारूच्या बाटल्यातील दारू खड्ड्यात ओतल्यावर वरून मातील टाकली जाणार आहे.
8/8
पोलिसांची ही मोठी कारवाई समजली जात असून, यामुळे शहरातील अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे...
Sponsored Links by Taboola